शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या आरोपीला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 00:10 IST

उधारीच्या पैशाच्या कारणावरुन भर दिवसा अंजनगाव सुर्जी येथील आठवडी बाजारात एका इसमाची हत्या केल्याप्रकरणी चिखलदरा तालुक्यातील सात्ती येथील रहिवासी असलेल्या ...

परतवाडा : उधारीच्या पैशाच्या कारणावरुन भर दिवसा अंजनगाव सुर्जी येथील आठवडी बाजारात एका इसमाची हत्या केल्याप्रकरणी चिखलदरा तालुक्यातील सात्ती येथील रहिवासी असलेल्या बापुराव लक्ष्मणराव याला अचलपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.अंजनगाव पोलीस ठाणे येथे अपराध क्रमांक ८७/२०१४ रोजी कलम ३०१ प्रमाणे आरोपी बापूराव लक्ष्मणराव (वय ३८ वर्षे रा. सत्ता.ता.चिखलदरा) याचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपीने सुधाकर देवीसिंग राठोड (मृत) राहणार रुर्फफाटा तालुका चिखलदरा यास उधारीच्या पैशाचे वादावरुन भरदिवसा आठवडी बाजार अंजनगाव सुर्जी या ठिकाणी चाकूने छातीत भोसकून त्याचा निर्घृण खून केला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने त्यात सरकारी पक्षातर्फे भोला चौहाण शासकीय सहायक अधिवक्ता यांनी सरकारतर्फे भक्कम बाजू मांडली. सदरचे प्रकरणात सरकारतर्फे १२ सरकारी साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर गुन्ह्याचे गांभीर्य व तथ्य मांडले परिणामी आरोपी यास ३०४ भाग-१ भादंवि या कलमान्वये मृतक सुधाकर देवीसिंग राठोड यांचा खून केल्याबाबत दोषी धरुन न्यायालयाने आरोपीस १० वर्षाची सक्त मजुरीचा कारावास व रुपये ३००० दंड अशी शिक्षा सुनावली. सदरचा न्यायनिर्णय हा न्यायाधीय एस.बी. हेडावू जिल्हा न्यायाधीय-३ तथा सत्र न्यायाधीश, अचलपूर यांनी दिनांक १२ मे २०१६ रोजी दिला. सदरच्या न्यायनिर्णयामुळे न्याय मिळाल्याची भावना जनमानसात व्यक्त होत आहे. तसेच कायद्याची बाजू बळकट झाल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. या घटनेमुळे त्यावेळी परिसरात मोठी खळबळ उडाली होती. (प्रतिनिधी)