शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
4
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
5
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
6
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
7
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
8
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
9
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
10
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
12
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
13
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
14
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
15
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
16
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
17
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
18
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
19
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
20
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
Daily Top 2Weekly Top 5

१० हजारांवर भटक्या श्वानांची नसबंदीच नाही, प्रशासनाचे दुलर्क्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST

अमरावती : महापालिका क्षेत्रात श्वानांची संख्या १० हजारांवर आहे. दरवर्षी शेकडो व्यक्तींना चावा घेतला जात असताना त्यांच्या संख्यावाढीवर नियंत्रण ...

अमरावती : महापालिका क्षेत्रात श्वानांची संख्या १० हजारांवर आहे. दरवर्षी शेकडो व्यक्तींना चावा घेतला जात असताना त्यांच्या संख्यावाढीवर नियंत्रण नाही. या श्वानांच्या निर्बिजिकरणाची प्रक्रिया चार वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदर मोठ्या प्रमाणात वाढत असून, तातडीने ही प्रक्रिया राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

भटक्या श्वानांच्या नसबंदी संदर्भात केंद्र व राज्य शासनाच्या कडक गाईडलाईन आहेत. याशिवाय जिल्हा प्राणीक्लेश समिती व जिल्हा प्राणी जन्म नियंत्रण समितीच्यादेखील गाईडलाईन आहेत. सन २००१ पासून याची महापालिका क्षेत्रात अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे पशुशल्यचिकित्सक सचिन बोंद्रे यांनी सांगितले. या सर्व प्रकारांत एनजीओ पुढे येत नाही. महापालिकेद्वारा तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविली. आतादेखील निविदा प्रक्रियेतच असल्याचे बोंद्रे म्हणाले.

दरम्यान भटक्या श्वानांच्या जन्मसंख्येवर कुणाचेच नियंत्रण नसल्याने या श्वानांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या श्वानांच्या बंदोबस्ताचा विषय अनेकदा चर्चेला आला. निर्बिजिकरणाचे २००० टार्गेटदेखील आहे. मात्र, अद्याप कुठलाच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

बॉक्स

श्वान पकडण्यासाठी खासगी व्यक्ती

महापालिका क्षेत्रात श्वान पकडण्यासाठीचा कंत्राट एका खासगी व्यक्तीला देण्यात आलेला आहे. या विभागाजवळ याकरिता मनुष्यबळ नाही. त्यामुळे ही प्रक्रिया राबविण्यात आलेली होती. श्वान पकडल्यानंतर त्यांना सोडणार कुठे, हा प्रश्नदेखील निर्माण होतो. यासाठी सेल्टर होम, प्रथमोपचार केंद्र आदिची सुविधा नाही. त्यामुळे पकडलेले श्वान पुन्हा त्याच भागात सोडले जात असल्याची माहिती आहे.

बॉक्स

या भागात भटके श्वान अधिक

ज्या भागात उघड्यावर अन्न, मांस टाकले जातात, त्या भागात भटक्या श्वानांची संख्या अधिक आहे. सध्या महापालिका क्षेत्रात लालखडी, इतवारा, गाडगेनगर व बडनेरा आदी भागांत भटक्या श्वानांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येते.

पाईंटर

एका श्वानाच्या नसबंदीसाठी खर्च १५०० रुपये

कंत्राटाकरिता सध्या निविदा प्रक्रिया

बॉक्स

रोज १५ ते २० तक्रारी

महापालिकेकडे साधारणपणे रोज १५ ते २० तक्रारी मोकाट श्वानांसंदर्भात दाखल होतात. प्रत्यक्षात किती कारवाई होतात, हे सांगणे अवघडच आहे. मुळात याबाबतची यंत्रणा नाही. मोकाट श्वान पकडल्यानंतर सेल्टर होम नाही, प्रथमोपचार सुविधा नाही. त्यामुळे या तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

कोट

महपालिका क्षेत्रात सध्या भटक्या श्वानावर निर्बिजीकरणाची प्रक्रिया करणारी यंत्रणा नाही. याविषयीची निविदा प्रक्रियेत आहे. तुर्तास खासगी एजंन्सीद्वारा हे श्वान पकडण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

डॉ सचिन बोंद्रे

पशू शल्य चिकीत्सक (महापालिका)