अकोला, दि. ११ : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविणार्या योगेश जवादे याला कोतवाली पोलिसांनी रविवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. काही दिवसांपूर्वी खडकी भागात राहणारा योगेश नामदेव जवादे (२३) याने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी युवकाविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी तपास करून आरोपी योगेश याचा शोध घेतला. त्याला शुक्रवारी कोतवाली पोलिसांनी अटक केली. रविवारी त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आरोपी योगेशची कारागृहात रवानगी केली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}