शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

वाई, शहापूर प्रकल्पाच्या भूसंपादन व पुनर्वसनाची कामे तातडीने करा!

By admin | Updated: July 15, 2015 01:31 IST

विभागीय आयुक्तांचे निर्देश; प्रकल्पांच्या कामांचा घेतला आढावा.

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील वाई व आकोट तालुक्यातील शहापूर प्रकल्पाची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी या दोन्ही प्रकल्पांतर्गत भूसंपादन व पुनर्वसनाची कामे तातडीने मार्गी लागवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर यांनी मंगळवारी संबंधित अधिकार्‍यांना दिले. या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविली होती. विदर्भातील सिंचन प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनियंत्रण कक्ष सुरू केला आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील १0 प्रकल्पांचा समावेश आहे. या १0 प्रकल्पांमध्ये अकोला जिल्हय़ातील वाई आणि शहापूर या प्रकल्पांचा समावेश आहे. या दोन्ही प्रकल्पांचा समावेश वॉररूम (युद्धपा तळीवर) मध्ये केला आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहे त. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्तांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, सहायक आयुक्त ओ.आर. अग्रवाल, भूसंपादन अधिकारी शरद पाटील, मिलिंद शेगावकर, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, शैलेश हिंगे, गजानन निपाणे यांच्यासह अकोला पाटबंधारे विभागाचे अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वाई व शहापूर प्रकल्पाच्या भूसंपादनासह पुनर्वसनाची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केल्या. वाई प्रकल्पातील पुनर्वसित गाव खरप नवले या गावाचा पुनर्वसन आराखडा मंजूर असून, नागरी सुविधांना मान्यता देण्यात आली आहे. सदर प्रकल्पाचे काम त्वरित करावे,असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. याशिवाय जिल्ह्यातील इतर सिंचन प्रकल्पांच्या कामाचा आढावाही त्यांनी घेतला.

*मुख्यमंत्री घेणार ५ ऑगस्टला आढावा

         विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांनी सनियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाअंतर्गत समावेश करण्यात आलेल्या प्रकल्पांच्या कामांचा आढावा खुद्द मुख्यमंत्रीच ५ ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेणार आहेत. यापूर्वी १0 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी या प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतला होता. शुक्रवार, १७ जुलै रोजी ते पुन्हा या कामांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री आढावा घेणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.