कामगार दिनानिमित्त कार्यशाळा

By Admin | Updated: May 6, 2014 21:24 IST2014-05-06T18:04:39+5:302014-05-06T21:24:23+5:30

आकोट : स्थानिक शनवारा येथे कामगार दीन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून ॲड. किरणताई रोही होत्या. त्यांनी कामगारांच्या समस्या, त्यासाठी असलेले कायदे, कामगारांचे संघटन, कामगारांसाठीचे विविध कायदे, महिला कामगारांसाठी भारतातील कायदे याची माहिती दिली. कामगारांनी संघटित व्हायला हवे तसेच त्यांना सरकारी लाभ मिळावा, त्यासाठी योग्य ती अंमलबजावणी करून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी महेश खलोकार, अमित हाडोळे, सागर नाथे, रमण उपासे, रोशन डामरे, ऋषिकेश सुपासे, हेमंत लहाने, भूषण नाथे, विशाल रोही आदींचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)

Workshop on workers day | कामगार दिनानिमित्त कार्यशाळा

Web Title: Workshop on workers day