शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचार्‍यांचे आजपासून कामबंद आंदोलन

By admin | Updated: June 25, 2014 02:40 IST

सुसूत्रतेसाठी महापालिका प्रशासनाने घेतला बदल्यांचा निर्णय.

अकोला : झोननिहाय बदल्यांना विरोध करीत सफाई कर्मचार्‍यांनी मंगळवारी आंदोलनाचे हत्यार उपसले. उद्या, बुधवारपासून कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.
शहरातील स्वच्छतेची समस्या मार्गी लागण्यासाठी महापालिका प्रशासनाने सफाई कर्मचार्‍यांच्या झोननिहाय नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला अखिल भारतीय सफाई मजदूर कॉँग्रेसने विरोध केला. पूर्वसूचना अथवा चर्चा न करताच मनपाने ७४0 सफाई कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. सफाई कर्मचारी विजयनगर, शिवाजीनगर, बापूरनगर, चवरे प्लॉट, खदान या भागात राहतात. बदल्यांमुळे त्यांना संबंधित वॉर्डात जाणे व येण्यासाठी रोज ४0 रुपये खर्च येणार आहे.
लवकरच शाळ सुरू होणार आहे. बदल्यांमुळे महिलांना लवकर घराबाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल, असाही दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे या बदल्या रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉँग्रेसने चे प्रदेश महामंत्री पी.बी. भातकुले, जिल्हाध्यक्ष शांताराम यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. दरम्यान सफाई कामगारांनी कर्मचार्‍यांनी बदली झालेल्या ठिकाणी रुजू व्हावे असे आवाहन महापौर ज्योत्स्ना गवई व उपमहापौर रफिक सिद्दिकी यांनी केले आहे. बदली निर्णय हा महापालिका प्रशासनाने स्वच्छतेकरिता घेतला आहे.

*सफाई कर्मचार्‍यांवर होतो १ कोटी १३ लाख खर्च
मनपामध्ये ४ हजार २७२ कर्मचारी असून, यामध्ये ७४८ सफाई कर्मचार्‍यांचा समावेश आहे. सफाई कर्मचार्‍यांच्या वेतनापोटी १ कोटी १३ लाख मनपाला मोजावे लागतात. असे असतानाही शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग पडलेले असतात आणि नाल्याही प्रचंड तुंबलेल्या असतात. अनेक कर्मचारी वेळेवर कामावर येत नाहीत. तसेच काही जण तर गैरहजर असतात, असा आरोप नगरसेवकांमधून नेहमीच होतो.