शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

By admin | Updated: July 14, 2014 00:18 IST

जिल्हा परिषद व राज्य सार्वजनिक आरोग्य कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला - जिल्हा परिषद व राज्य सार्वजनिक आरोग्य कर्मचार्‍यांनी सोमवार, १४ जुलै रोजी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी हे कर्मचारी कामबंद आंदोलन करून धरणे आंदोलन करणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य कर्मचार्‍यासंह शासकीय आरोग्य विभागातील हिवताप व हत्तीरोग विभागाचे कर्मचारीही सहभागी होणार आहेत.केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एलएचव्ही पदांची भरती करणे, जिल्हा प्रशिक्षण पथकामध्ये २ एलएचव्ही पदे भरणे, आरोग्य सहाय्यक पदाचे ग्रेडवेतन २ हजार ८00 रुपये करणे, आरोग्यसेवक पदाची शैक्षणिक पात्रता एचएससी करून प्रशिक्षण कालावधी दोन वर्षांंचा करणे, आरोग्य सेवकाकडील डाटा एंट्री ऑपरेटर व एनआरएचएमची कामे बंद करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात बाहय रुग्ण व आंतररुग्ण विभागात स्वतंत्र पदे भरणे, महिला आरोग्य सेविकांना एनआरएचएम सेवेत कायम करणे, आरोग्य कर्मचार्‍यांच्या पदनाम बदलाचे आदेश निर्गमित करणे, अर्धवेळ स्त्री परिचर यांना किमान वेतन १0 हजार रुपये लागू करणे, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांप्रमाणे वर्ग ४ च्या पदावर सामावून घेणे, औषध निर्माण अधिकारी या पदाची वेतनातील त्रुटी दूर करणे, डॉक्टर खानंदे समितीच्या अहवालानुसार आरोग्य पर्यवेक्षकांची पदे भरणे, हिवताप विभागात निवड समितीने निवड केलेल्या आरोग्य सेवकांच्या सेवा नियमित करणे, बंदपत्रीत आरोग्य सेवक यांच्या सेवा नियमित करणे यासह विविध मागण्यांसाठी आरोग्य कर्मचारी सोमवारी कामबंद आंदोलन करणार आहेत. मागण्या मान्य होत नसल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा आरोग्य कर्मचार्‍यांना दिला आहे.