शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी सुरू केला भाडेतत्वावर दुग्ध व्यवसाय

By admin | Updated: August 4, 2014 00:32 IST

महिला सक्षमीकरण : १ कोटी रूपये कर्जाचे योग्य नियोजन

वाशिम: स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहेत. महिलांचे सक्षमिकरण व त्यांचे संरक्षण करण्याच्या विडा उलचलेल्या एका संस्थेने १ कोटी रूपयांचे कर्ज प्राप्त करून त्याचे योग्य नियोजन केले. आज वाशिम जिल्हयातील अनेक बचतगटातील महिलांनी भाडे तत्वावर शेती व दुग्ध व्यवसायास सुरूवात करून यशाची पायरी चढत आहेत.१९९४ पासून महिलांना शासकीय व निमशासकीय सेवेत ३0 टक्के आरक्षण देण्यात आले. या आरक्षणामुळे शासकीय सेवेत महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या व त्या स्वावलंबी होण्यास मदत झाली. तळागाळातील स्त्री विकासासाठी पंचायत स्तरावर महिलांना ५0 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे तळापर्यंत राजकीय अधिकार प्राप्त होण्यास मदत झाली. अशा प्रकारे स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न झाले व केल्या जात आहे. वाशिम येथील स्वयं शासन बहुउदेशिय महिला विकास संस्थेच्यावतिने जिल्हयाभरात ६५0 बचत गट स्थापन केले. या संस्थेच्या पुढाकाराने तथा मार्गदर्शनामुळे ७0 महिला बचत गटांना विविध व्यवसायासाठी नाबार्ड कडून महिला सक्षमीकरणाकरीता कर्जाची मागणी करण्यात आली. नाबार्डच्यावतिनेही १ कोटी रूपयांचे ऑनलाईन कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. कर्ज मंजुर झालेल्या बचत गटातील महिला या कर्जामधून प्रामुख्याने भाडे तत्वावर शेती व दुग्ध व्यवसाय करीत आहेत. तर काही महिला बचत गटाने मुलांचे शिक्षणाकरीता याचा वापर केला आहे.स्वयंशासन बहुउदेशिय महिला विकास संस्था वाशिमचे अध्यक्षा कमल माधव इंगोले यांनी सर्व प्रथम महिला सक्षमिकरण दृष्टीने स्वताला सामाजिक कार्यात झोकून दिले व याला संस्थेचे संचालक माधव इंगोले यांनी साथ दिली.जिल्हयाभरात स्थापन करण्यात आलेल्या ६५0 बचत गटांना विविध योजनांची माहिती, बँकेसंदर्भातील माहितीसह आवश्यक प्रशिक्षण दिले. गत दोन महिन्यात नाबार्डच्या मदतीने ६५0 पैकी ७0 महिला बचत गटाना एक कोटी रूपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले त्यामध्ये सावित्रीबाई महिला बचत गट काजळंबा, पंचशिल महिला बचत गट ब्राम्हणवाडा, वाशिम येथील बालाजी महिला बचत गट , कोंडेश्‍वर महिला बचत गट ,काळे फाईल , चामुंडा माता महिला बचत गट, दुर्गामाता महिला बचत गट, स्वराज महिला बचत गट, आदीमाय शक्ती महिला बचत गट, एकविरा महिला बचत गट, बालाजी महिला बचत गट, दुर्गा महिला बचत गट, भोयता येथील भिमशक्ती महिला बचत गट , एकता महिला बचत गट, आाम्रपाली महिला बचत गट, गौतमी महिला बचत गट, अनसिंग येथील बाबा सैलानी महिला बचत गट, शारदादेवी, महिला बचत गट, शारदा मॉ महिला बचत गट, मॉ वैष्णवी महिला बचत गट, जगदंबा महिला बचत गट, अण्णाभाऊ साठे महिला बचत गट, यशोदा महिला बचत गट, हाजी मस्तान महिला बचत गट, जय संतोषी मॉ महिला बचत गट, मालेगाव येथील जय संतोषी माता महिला बचत गट , शारदा महिला बचत गट, स्वामी सर्मथ महिला बचत गट, नवसिन महिला बचत गट, विठोली येथील लहुजी महाराज महिला बचत गट, दापुरा येथील दयावाणी महिला बचत गट, संत गजानन महाराज महिला बचत गट, प्रगती महिला बचत गट, मसनी येथील बसेश्‍वर महिला बचत गट, नम्रता महिला बचत गट, मिस्टर बालगणेश महिला बचत गटासह अनेक बचत गटांचा समावेश आहे.