वाडेगावचा ग्रामविकास अधिकारी निलंबित

By Admin | Updated: July 18, 2015 01:44 IST2015-07-18T01:44:12+5:302015-07-18T01:44:12+5:30

नऊ लाभार्थींंना घरकुलाचा दुबार लाभ; ‘सीईओ’चा आदेश.

Wadegaon Rural Development Officer Suspended | वाडेगावचा ग्रामविकास अधिकारी निलंबित

वाडेगावचा ग्रामविकास अधिकारी निलंबित

अकोला : इंदिरा आवास योजनेंतर्गत नऊ लाभार्थींंना घरकुलाचा दुबार लाभ देण्यात आल्याने बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील ग्राम विकास अधिकारी (व्हीडीओ) एम.एस. शेगोकार यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एम.देवेंदर सिंह यांनी गुरुवारी दिला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामार्फत राबविण्यात येणार्‍या इंदिरा आवास योजनेंतर्गत वाडेगाव येथील दोन लाभार्थींना सन २00८-0९ व २0१४-१५ मध्ये आणि सात लाभार्थींना २00९-१0 व २0१४-१५ मध्ये घरकुलांचा दुबार लाभ देण्यात आला. तसेच २0१४-१५ मध्ये घरकुल लाभार्थींना प्रत्येकी देय असलेल्या ९५ हजार रुपये अनुदानानुसार नऊ लाभार्थींपैकी एका लाभार्थीला ७0 हजार रुपये व उर्वरित आठ लाभार्थींना ९५ हजार रुपयांप्रमाणे एकूण ८ लाख ३0 हजार रुपये अदा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात बाळापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍याकडून प्राप्त चौकशी अहवालानुसार घरकुलांचा दुबार लाभ देऊन आणि वरिष्ठांची दिशाभूल करून, कर्तव्यात कसूर केल्याने, वाडेगाव येथील ग्रामविकास अधिकारी एम.एस. शेगोकार यांना सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी दिला.

Web Title: Wadegaon Rural Development Officer Suspended