खेड्यात प्रक्रिया उद्योगाची ग्राम समृद्धीकडे वाटचाल

By Admin | Updated: May 7, 2014 04:14 IST2014-05-06T18:58:44+5:302014-05-07T04:14:47+5:30

अकोला : गावातील शेतमाल गावातच प्रकिया करू न रोजगार निर्मितीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल तर आहेच; पण ग्राम समृद्धीचा हा खरा मूलमंत्र आहे. कंझरा येथील महिला बचत गटाने उभारलेला हा उद्योग त्याचाच भाग असून, कृषी विद्यापीठ अशा उद्योगांना तंत्रज्ञान पुरविण्यास कटिबद्ध असल्याचे आश्वासन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी बचत गटांना दिले.

In the village, the village of the processing industry will move towards prosperity | खेड्यात प्रक्रिया उद्योगाची ग्राम समृद्धीकडे वाटचाल

खेड्यात प्रक्रिया उद्योगाची ग्राम समृद्धीकडे वाटचाल

अकोला : गावातील शेतमाल गावातच प्रकिया करू न रोजगार निर्मितीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल तर आहेच; पण ग्राम समृद्धीचा हा खरा मूलमंत्र आहे. कंझरा येथील महिला बचत गटाने उभारलेला हा उद्योग त्याचाच भाग असून, कृषी विद्यापीठ अशा उद्योगांना तंत्रज्ञान पुरविण्यास कटिबद्ध असल्याचे आश्वासन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी बचत गटांना दिले.
कंझरा येथील रेणुका महिला बचत गटाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन आज मंगळवारी डॉ. दाणी यांनी केले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार यांच्यासह महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्रणिता मारोटकर, सचिव सरिता शामसुंदर, सविता वाशिमकर, निर्मला बाणेकर, अनुराधा पारसकर, प्रतिभा हळदे, कल्पना पुंड, प्रीती अलाट, गीता नांदुरकर, मुनूल शहा, शुभांगी काळे, बाळाभाऊ कथलकर, ए.आर. पवित्रकार आदींसह कृषी विद्यापीठ, कृषी अधिकार्‍यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. दाणी यांनी आता मार्गदर्शनासह प्रत्यक्ष कामाच्या अंमलबजावणीची गरज असल्याचे सांगितले. कंझरा येथील उद्योग उभा झाला हा प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचाच भाग आहे. उद्योग उभा झाला असला तरी त्याला चालविण्याची जबाबदारी प्रत्यक्ष काम करणार्‍यांची आहे. तंत्रज्ञान पुरविण्याच्या बाबतीत मात्र आम्ही बचत गटाच्या मागे खंबीरपणे उभे आहोत, असे ते म्हणाले.
महादेवराव भुईभार यांनी ग्राम समृद्धीचे खरे पाऊल असल्याचे सांगून इतर महिला गटांनीसुद्धा कंझरा येथील रेणुका महिला बचत गटाची प्रेरणा घेऊन वाटचाल करावी, त्यावेळेसच या चळवळीला व्यापक स्वरू प येईल, असा आशावाद व्यक्त केला. या प्रकल्पाचे समन्वयक संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर यांनी या बचत गटाने केलेले धाडस वाखाणण्याजोगे असल्याचे संागून कृषी विद्यापीठ अशा बचत गटाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची त्यांनी ग्वाही दिली. या कार्यक्रमाला कंझरा व परिसरातील महिला शेतकरी, गावकर्‍यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
फोटो : महिला बचत गटाला मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, व्यासपीठावर कृषी विद्यापीठ व कृषी विभागाचे अधिकारी ०७ सीटीसीएल २४

Web Title: In the village, the village of the processing industry will move towards prosperity