विदर्भात कमाल-किमान तापमानात वाढ!

By Admin | Updated: February 27, 2015 00:24 IST2015-02-27T00:24:56+5:302015-02-27T00:24:56+5:30

विदर्भात रात्रीच्या किमान तापमानातही वाढ.

Vidarbha high-low temperature rise! | विदर्भात कमाल-किमान तापमानात वाढ!

विदर्भात कमाल-किमान तापमानात वाढ!

अकोला : विदर्भातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली असून, दिवसाच्या तापमानात वाढ झाल्याने कडक उन्हाळ्य़ाची चाहूल लागली आहे. अकोला शहराचे कमाल तापमान ३७ डीग्री सेल्सिअसच्यावर पोहोचले. दरम्यान, येत्या २८ फेब्रुवारी रोजी राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. गेल्या चोवीस तासात गुरुवारी सकळी ८.३0 पर्यंत विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कोरडे राहील. दरम्यान, विदर्भात रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे. गत चोवीस तासात अकोल्याचे किमान तापमान २0 अंशावर पोहोचले आहे, तर अमरावती १८.८, बुलडाणा २0.४, ब्रह्मपुरी १७.९, चंद्रपूर १८.0, नागपूर १६.0, वाशिम २२.४, वर्धा १७.५ आणि यवतमाळचे किमान तापमान ११७.६ अंशाने वाढले आहे.

Web Title: Vidarbha high-low temperature rise!