शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

कोळशाच्या राखेचा वापर आता शेतात!

By admin | Updated: December 10, 2014 00:08 IST

राज्यातील औष्णिक केंद्राची राख उपलब्ध; शेतक-यांना प्रशिक्षण.

रजरत्न सिरसाट/अकोला राखेचा वापर केल्याने शेतमाल उत्पादनात २५ टक्के वाढ झाल्याचे एका संशोधनाअंती निष्पन्न झाल्याने मुख्यत्वे कोरडवाहू शेतात या राखेचा वापर करण्यात येणार आहे. ही राख मिळविण्यासाठी राज्यातील सात औष्णिक वीज निर्मिती केंद्रांसोबत नव्याने करार करण्यात येत असून, शेतात राख वापरण्याबाबत दिल्ली येथील ह्यफ्लाय अँश रिसर्च अँन्ड मॅनेजमेंटह्णच्यावतीने शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.देशातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतून दरवर्षी २३00 लाख टन राखेची निर्मिती होते. त्यापैकी प्रत्यक्षात १३00 लाख टन राखेचाच वापर विटा, सिमेंट, टाईल्ससह विविध बाबींसाठी केला जातो; या राखेचा शेतात वापर करण्यासाठीचे संशोधन दिल्ली येथील सेंटर फॉर फ्लॉय अँश रिसर्च अँन्ड मॅनेजमेंटच्या संशोधकांनी केले असून, या राखेत शेतीची सकसता वाढविण्यासाठी उपयोगी पडणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, अन्नद्रव्ये, सूक्ष्मअन्नद्रव्य, जिप्सम आदी अनेक घटक आढळून आले आहेत. याशिवाय तीन प्रकारची खनिजेही या राखेतून मिळतात. त्यामुळे या राखेचा वापर शेतात करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या राखेचा वापर शेतात करता यावा, यासाठी दिल्लीच्या या संशोधन संस्थेकडून देशासह महाराष्ट्रातील खापरखेडा, कोराडी, चंद्रपूर, भुसावळ दीपनगर, पारस, परळी, नाशिक एकलारा या औष्णिक वीज निर्मिती केंद्रांसोबत शेतीला राख उपलब्ध करू न देण्यासंबंधी नव्याने करार करण्यात येणार आहे. या राखेच्या वापरामुळे सोयाबीनचे उत्पादनात २५ टक्के वाढ होत असल्याचे निदर्शनात आले असून, कापूस, फळ व भाजीपाला व इतर खरीप व रब्बी पिकांच्या उत्पादनात १0 ते १५ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यासाठी संशोधन संस्थेच्यावतीने शेतकर्‍यांना या औष्णिक वीज निर्मिती केंद्रावर नेऊन प्रशिक्षण दिले जात आहे. या राखेमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असल्याने कोरडवाहू प्रक्षेत्रावर ही राख वापरण्यासाठीची शिफारस या संशोधन केंद्राने केली आहे. ही राख शेतात वापरल्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नसून, शेत मऊ ठेवण्यास ती उपयोगी पडते. त्यामुळे औष्णिक केंद्रांचा राख साठवणुकीचा प्रश्नही निकाली निघणार आहे. औष्णिक वीज केंद्रातील राख शेतात वापरल्याने उत्पादनात वाढ झाली असून, ही राख कोरडवाहू क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त आहे. उत्पादन वाढल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होऊ शकते. परंतु राख वाहून नेण्यासाठी शासनाने शेतकर्‍यांना मदत करण्याची गरज असल्याचे सेंटर फॉर फ्लाय अँश रिसर्च अँन्ड मॅनेजमेंट, नवी दिल्लीचे डॉ. विमल कुमार यांनी स्पष्ट केले. *अल्पभूधारक शेतकर्‍यांना मदतीची गरज राज्यात अल्पभूधारक शेतकर्‍यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या शेतकर्‍यांना औष्णिक वीज केंद्रातील राख वाहून नेण्याचा खर्च परवडत नसल्याने शासनाने ही राख वाहून नेण्यासाठी शेतकर्‍यांना अनुदान देण्याची गरज आहे.