शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेतील कला शिक्षकांची नियुक्ती नियमबाह्यच!

By admin | Updated: June 21, 2014 01:26 IST

शिक्षकांच्या वेतनाचा भार मनपाने उचलण्याचा शेरा शिक्षण उपसंचालक राम पवार यांनी नमूद केला.

आशिष गावंडे /अकोला
महापालिकेतील अस्थायी ३१ कला शिक्षकांची नियुक्ती नियमबाह्य असल्यामुळे या शिक्षकांच्या वेतनाचा भार मनपाने उचलण्याचा शेरा शिक्षण उपसंचालक राम पवार यांनी स्पष्टपणे नमूद केला. कला शिक्षकांना २0१२-१३ मध्ये अदा केलेली पाचव्या वेतन आयोगाची २ लाख १४ हजारांची रक्कम नियमबाह्यरीत्या दिल्याचा ठपका ठेवत या शिक्षकांच्या वेतनाचा भार मनपा प्रशासनाने उचलण्याचे मत त्यांनी नोंदवले. वेतनाच्या ह्यऑनलाईनह्ण प्रक्रियेत कला शिक्षकांच्या समायोजनाचा मुद्दा उपस्थित झाला असून, यावर आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नऊ कला शिक्षकांना सेवेत कायम करून त्यांना सन १९९४ पासून वेतन श्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल असून, ती न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणातील तांत्रिक व कायदेशीर बाजू जाणीवपूर्वक न तपासता, १0 ऑक्टोबर २0१३ च्या सभेत ३१ कला शिक्षकांना सेवेत कायम करण्याबाबतचा ठराव ऐन वेळेवरील विषयांमध्ये मंजूर करण्यात आला होता. या प्रकाराला ह्यलोकमतह्णने वाचा फोडताच, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरली. नेमक्या याच मुद्यावर शिक्षण उपसंचालक राम पवार यांनी आक्षेप नोंदवले आहेत. अस्थायी कला शिक्षकांची नियुक्ती नियमबाह्य व प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, त्यांना पाचव्या वेतन आयोगाची रक्कम दिली कशी, असा सवाल शिक्षण उपसंचालकांनी उपस्थित केला. शिवाय अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्यानंतरच ह्यऑनलाईनह्ण वेतन प्रणालीचा मार्ग खुला होणार आहे. सद्यस्थितीत ५५ मनपा शाळेत कार्यरत ३२४ शिक्षकांपैकी संच मान्यतेनुसार ३0 शिक्षक अतिरिक्त ठरले. अशावेळी ३१ अस्थायी कला शिक्षकांचे समायोजन करायचे की आस्थापनेवरील कायम शिक्षकांचे, या मुद्यावर शिक्षण विभाग बुचकळ्य़ात पडला आहे. सेवेतील कायम शिक्षकांचे समायोजन केल्यास, तो अन्याय ठरण्याची शक्यता आहे. या मुद्यावर शिक्षण विभागाने आयुक्तांकडे सादर केलेली फाईल मुख्य लेखा परीक्षक सुरेश सोळसे यांच्याकडे पाठवण्यात आली. मुळात सेवेतील कायम व अस्थायी कला शिक्षकांच्या समायोजनासंदर्भात मुख्य लेखा परीक्षकांनी निर्णय घेणे अपेक्षित असताना त्यांनी कला शिक्षकांच्या पाचव्या व सहाव्या वेतन आयोगातील रकमेवर आक्षेप नोंदवल्याची माहिती आहे. कला शिक्षकांच्या प्रकरणात अनेकांचे हितसंबंध असल्याने यावर आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.