शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी काढले अनधिकृत फलक, झेंडे

By admin | Updated: January 7, 2015 01:26 IST

अकोल्यात अनधिकृत फलक, बॅनर काढण्याची विशेष मोहीम सुरू.

अकोला : साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास अनधिकृत फलक, बॅनर काढण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेंतर्गत शहरातील सर्वच रस्त्यांवर, विद्युत खांबांवर, इमारतींवर लागलेले अनधिकृत फलक, बॅनरसोबतच हिरवे, केशरी व निळय़ा रंगाचे झेंडे मंगळवारी पोलिसांनी काढले. डॉ. मुंढे यांनी सोमवारी महापालिकेच्या मदतीने शहरामध्ये ठिकठिकाणी लागलेले राजकीय पक्ष, सामाजिक, धार्मिक संघटना आणि व्यापार्‍यांचे फलक, होर्डिंग, बॅनर आणि झेंडे काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पोलीस, आरसीपीचे जवान, अग्निशमन दल, गजराजच्या मदतीने टिळक रोड ते आकोट स्टँड चौक, आकोट स्टँड चौक ते सुभाष चौक, दीपक चौक, संतोषी माता चौक ते रेल्वे स्टेशन चौक आदी भागांतील रस्ते, इमारती, विद्युत खांबांवर लावलेले अनधिकृत फलक, बॅनर, होर्डिंग आणि विविध प्रकारचे झेंडे काढून टाकण्यात आले. परवानगी असलेल्या बॅनर, होर्डिंग व फलकांवर पोलीस पथकाने कारवाई केली नाही. गत काही महिन्यांपासून शहरातील प्रमुख चौक, रस्त्यांवर अनधिकृत फलक, बॅनर, होर्डिंग, झेंडे आणि भगव्या व हिरव्या पताका लावण्याची स्पर्धाच लागली आहे. एकप्रकारे या फलक, बॅनर, झेंड्यांमुळे शहर विद्रुप झाले. या फलक, बॅनरवर मंदिर, मशिदींसोबत देवता, थोर महापुरुषांची छायाचित्रे असल्याने त्यांची विटंबना केल्याच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे शहरात तणावही निर्माण झाला होता. या दृष्टिकोनातूनच सहायक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी ही विशेष मोहीम हाती घेतली.