अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक; युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 10:56 AM2019-12-11T10:56:40+5:302019-12-11T10:58:36+5:30

अपघातात गंभीर जखमी झालेला युवक अर्धातास घटनास्थळावर पडून होता.

Two-wheeler hit by unknown vehicle; The youth killed | अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक; युवक ठार

अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक; युवक ठार

Next
ठळक मुद्देगणेश अरूण घाटोळ (२८)असे मृत युवकाचे नाव आहे.अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीस जबर धडक दिली.त्याला उचलून उपचारासाठी नेण्यास कुणीही मदत केली नाही.

वाडेगाव : अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने युवक ठार झाल्याची घटना वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ १० डिसेंबर रोजी घडली. गणेश अरूण घाटोळ (२८)असे मृत युवकाचे नाव आहे. अपघातात गंभीर जखमी झालेला युवक अर्धातास घटनास्थळावर पडून होता.
वाडेगाव येथील गणेश अरुण घाटोळ हा युवक दुचाकीने प्राथमिक आरोग्य केंद्राजवळून जात होता. दरम्यान, अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये युवक गंभीर जखमी झाला. युवक दुचाकीसह खाली कोसळला होता.खाली पडल्यावर त्याला उचलून उपचारासाठी नेण्यास कुणीही मदत केली नाही. उलट या युवकाचे मोबाइलमध्ये फोटो काढण्यात घटनास्थळावरील लोकांनी धन्यता मानली. अखेर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने या गंभीर जखमी युवकास डॉ. मो.फैजान व रुग्णवाहिकाचालक जीवन इंगळे यांनी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ.मो. फैजान यांनी दिली. 


दोन दिवसात चौथा अपघात
वाडेगाव पसिरात गेल्या दोन दिवसात हा चौथा अपघात झाला आहे. परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दररोज अपघात घडत आहेत. अनेकांना अपंगत्व आले आहे, तर काहींना आपले प्राण गमवावे लागले आहे. गेल्या दोन दिवसात हा चौथा अपघात घडला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

 

Web Title: Two-wheeler hit by unknown vehicle; The youth killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.