चान्नी-पिंपळखुटा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक; तीन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:50 IST2020-12-04T04:50:44+5:302020-12-04T04:50:44+5:30

पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील रहिवासी अमोल गोविंदराव देशमुख (३६), हे दुचाकी एमएच ३० एडी ६४५४ ने पातूरहून पिंपळखुटाकडे जात ...

Two-wheeler collision on Channi-Pimpalkhuta road; Three serious | चान्नी-पिंपळखुटा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक; तीन गंभीर

चान्नी-पिंपळखुटा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक; तीन गंभीर

पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील रहिवासी अमोल गोविंदराव देशमुख (३६), हे दुचाकी एमएच ३० एडी ६४५४ ने पातूरहून पिंपळखुटाकडे जात होते, तर वाशिम जिल्ह्यातील साबीर खान (१७) व जफर खान (१८) हे पिंपळखुटा येथील कौटुंबिक कार्यक्रम आटोपून दुचाकी क्रमांक एमएच ३७ एस १८४१ ने वाशिमकडे जात होते. चान्नी-पिंपळखुटा मार्गावरील सोनाटी नाल्यानजीक दोन्ही भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात बालाजी सानप, बाळकृष्ण येवले यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकरणात पोलिसांच्या दप्तरी कुठल्याही प्रकारची फिर्याद किंवा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. (फोटो)

Web Title: Two-wheeler collision on Channi-Pimpalkhuta road; Three serious