शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

आगाराच्या जागेवर उभारणार व्यापारी संकुल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2017 01:30 IST

अकोला : गांधी-जवाहर बागेलगत असलेले बाजोरिया ग्राऊंड आणि टॉवरसमोरील आगार क्रमांक एकच्या जागेवर भव्य व्यापारी संकुल उभारण्याचा मानस महापालिकेचा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गांधी-जवाहर बागेलगत असलेले बाजोरिया ग्राऊंड आणि टॉवरसमोरील आगार क्रमांक एकच्या जागेवर भव्य व्यापारी संकुल उभारण्याचा मानस महापालिकेचा आहे. त्यादृष्टीने या दोन्ही जागा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवला जाणार आहे. यासाठी बुधवारी महापौर विजय अग्रवाल यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या.गांधी-जवाहर बागेलगत असलेल्या बाजोरिया ग्राऊंडचा आणि म.रा. परिवहन महामंडळ आगार क्रमांक-१ च्या जागेचा ताबा महापालिकेला देण्यात यावा. हे जर झाले तर महापालिकेला मध्य शहरात दहा एकराचा भव्य भूखंड उपलब्ध होईल. तीन ‘एफएसआय’मधून या ठिकाणी भव्य तीन मजली व्यापारी संकुलाची उभारणी करता येईल. रेडिरेक्टरच्या निविदा काढून महापालिका स्वावलंबी होऊ शकते. ४०-६० चा रेशो जरी धरला, तरी किमान पाचशे कोटींचे उत्पन्न येथून महापालिकेला मिळण्याची शक्यता आहे, असा प्रस्ताव तयार केला जात आहे. ७ जून रोजी मुख्यमंत्री फडणवीस अकोला दौऱ्यावर असताना त्यांच्यासमोर महानगर विकासाबाबत सात प्रस्ताव ठेवल्या जाणार आहेत. यामध्ये पहिला प्रस्ताव जागेचा आहे. त्यानंतर उर्दू शाळेच्या भाडेपोटी मिळणाऱ्या चार कोटींचा, पाणीपुरवठा कंत्रादारास पडणाऱ्या जीएसटीच्या भुर्दंडचा, हद्दवाढ झालेल्या भागांवरील ३१० कोटींच्या निधीचा, एलबीटीचे अनुदान वाढवून देण्याचा, अल्पदरात गरीब आणि दलित वस्तीमधील लोकांच्या घरकुलाविषयींच्या प्रस्तावांचा यामध्ये समावेश आहे. बुधवारी या सातही विषयांवरील प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू झाले. यातील किती प्रस्तावांना मुख्यमंत्री हिरवी झेंडी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महापौर विजय अग्रवाल यांनी बुधवारी त्यांच्या कक्षात बोलाविलेल्या आढावा बैठकीत मनपा आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके, सुरेश सुरोशे, सुरेश हुंगे, खान आदी विविध विभागातील अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.