शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

आज रामनवमी : विधीवत होणार पूजन; भाविकांसाठी मोठे रामद्वार बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 08:53 IST

शतकोत्तर परंपरा लाभलेल्या या मंदिराचे द्वार पहिल्यांदाच रामनवमीला भाविकांसाठी बंद राहणार आहे.

- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: अकोलेकरांचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिराएवढीच महती अकोल्यातील मोठे राम मंदिराला आहे. संत गजानन महाराजांच्या कृपाशीवार्दाने मंदिराची स्थापना झाली असून, विदर्भातील रामभक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. शतकोत्तर परंपरा लाभलेल्या या मंदिराचे द्वार पहिल्यांदाच रामनवमीला भाविकांसाठी बंद राहणार आहे; मात्र मंदिर संस्थानचे पदाधिकारी यांच्या उपस्थित शासनाने दिलेले निर्देश व सूचनांचे पालन करून विधिवत पूजा होणार आहे.मोर्णा नदीच्या तीरावर शहर कोतवाली पोलीस ठाण्यासमोर टिळक मार्गावर मोठे राम मंदिर आहे. शंभर वर्षांपेक्षा अधिक परंपरा लाभलेल्या या मंदिराचे बांधकाम प्राचीन आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या आकर्षक मूर्ती आहेत. अलीकडे प्रवेश द्वाराजवळ संत गजानन महाराजांचे मंदिर साकारले आहे. संत गजानन महाराज ज्या शिळेवर बसले होते, ती शिळा येथे आहे.

वर्षभर धार्मिक उत्सवमंदिराचा कारभार हरिहर रामचंद्र संस्थानच्या अध्यक्ष सुमन अग्रवाल पाहतात. मंदिरात वर्षभर विविध धार्मिक उत्सवाचे आयोजन होते. यामध्ये प्रामुख्याने रामनवमी, जन्माष्टमी, हनुमान जयंती सोहळे असतात. रामनवमी शोभायात्राची राज्यात वेगळी ओळख बनली आहे; मात्र यंदा कोरोना विषाणूच्या सावटामुळे चैत्र पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती महोत्सव फक्त धार्मिक विधी करून साजरा करण्यात येत आहे.

अशी झाली मंदिराची उभारणीसंत गजानन महाराज एका सभेसाठी अकोल्यात आले होते. राजेश्वर मंदिरासमोरील पटांगणात महाराजांची सभा होती. कार्यक्रमानंतर (कै.) बच्चुलाल अग्रवाल यांनी महाराजांना घरी येण्याचा आग्रह धरला. त्यांनी महाराजांना घरी आल्यावर प्रशस्त आसन, दागदागिने, उची वस्त्रे भेट दिली. गजानन महाराजांनी ते सर्व नाकारत एका शिळेवर आसनस्थ झाले. यावेळी बच्चुलाल अग्रवालांनी आपल्याला मुलबाळ नसल्याची खंत व्यक्त केली. त्यावेळी संत गजानन महाराजांनी राम मंदिराची स्थापना करण्याची आज्ञा केली. मंदिरासाठी जागेकडेही महाराजांनीच निर्देश केले. तेच हे आजचे मोठे राम मंदिर.

राम जन्मोत्सव दुपारीगुरुवार, २ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता धार्मिक रितीने पूजा-अर्चना व आरती करण्यात येणार आहे, तसेच चैत्रपाडवा ते रामनवमी आणि रामनवमी ते हनुमान जयंती,असे दरवर्षी प्रमाणे आयोजित धार्मिक कार्यक्रम विधिवत होत आहेत. फक्त जेथे गर्दी होईल,असे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती मंदिर संस्थानने दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाIndian Festivalsभारतीय सणTempleमंदिर