अकोल्यातील १२ केंद्रांवर आज ‘एमएच-सीईटी’ची परीक्षा

By Admin | Updated: May 8, 2014 22:03 IST2014-05-08T00:05:37+5:302014-05-08T22:03:31+5:30

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान सामाईक प्रवेश परीक्षा

Today, the 'MH-CET' examination in 12 centers in Akola | अकोल्यातील १२ केंद्रांवर आज ‘एमएच-सीईटी’ची परीक्षा

अकोल्यातील १२ केंद्रांवर आज ‘एमएच-सीईटी’ची परीक्षा



अकोला : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान सामाईक प्रवेश परीक्षा (एमएच-सीईटी)  गुरुवार, ८ मे रोजी अकोल्यातील १२ केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या केंद्रांवर जिल्ह्यातील ३ हजार २0७ विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, जिल्हा प्रशासनामार्फत परीक्षेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
अकोल्यातील जागृती विद्यालय, भारत विद्यालय, न्यू इंग्लिश हायस्कूल, माऊंट कारमेल उच्च माध्यमिक शाळा, होलीक्रॉस इंग्लिश कॉन्व्हेंट हायस्कूल, जी.एस.कॉन्व्हेंट व हायस्कूल, मेहेरबानू ज्युनिअर कॉलेज, उस्मान आझाद उर्दू हायस्कूल, गुरुनानक विद्यालय, सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा, शिवाजी महाविद्यालय, भिकमचंद खंडेलवाल विद्यालय  इत्यादी १२ परीक्षा केंद्रांवर ‘एमएच-सीईटी’ची परीक्षा घेण्यात येणार आहे.
गुरुवारी सकाळी ८ ते १0 या वेळेत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. अकोला जिल्हय़ातून ३ हजार २0७ विद्यार्थी  या परीक्षेला प्रविष्ट आहेत. परीक्षेच्या  पृष्ठभूमीवर ४ समवेक्षक, १३ केंद्रप्रमुख, ३८ पर्यवेक्षक, १९४ समवेक्षक, अशा एकूण २२९ अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली आहे.  

Web Title: Today, the 'MH-CET' examination in 12 centers in Akola