महावितरणचे वेळकाढू धोरण नागरिकांच्या जीवावर

By Admin | Updated: June 15, 2015 01:48 IST2015-06-15T01:48:14+5:302015-06-15T01:48:14+5:30

वीज वाहिनीच्या तारा दुरुस्तीस विलंब.

The time-line strategy of the MSEDCL is on the life of the citizens | महावितरणचे वेळकाढू धोरण नागरिकांच्या जीवावर

महावितरणचे वेळकाढू धोरण नागरिकांच्या जीवावर

अकोला: जुने शहरालगत ग्रामपंचायत भौरद, अंबिकानगर परिसरात, डाबकी रोड नंदाने मंगल कार्यालयामागील भागात कार्यान्वित उच्चदाब वीज वाहिनी परिसरातील नागरिकांच्या घरावरून हाताच्या अंतरावरून गेली आहे. या वाहिनीचा एक खांब वाकलेला आहे. त्यामुळे वीज तारा धोकादायक अंतरावर आलेल्या आहेत. परिणामी परिसरातील नागरिकांना दुमजलीच नव्हे तर एक मजली घर बांधतानासुद्धा विचार करावा लागतो, एवढय़ा तारा खाली आल्या आहेत. लहान मुले वरच्या मजल्यावर खेळायला जातात. महिला कपडे वाळायला नेतात तेव्हा अपघात होण्याचा धोका वाढतो. अनेकदा महिला व मुले जखमी झाल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत. यासंबंधी वीज कंपनीकडे तक्रार करण्यात आली; परंतु अधिकारी, कर्मचार्‍यांकडून दखल घेण्यात आली नाही. वीज कंपनीचे वेळकाढू धोरण परिसरातील नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. लोंबकळणार्‍या वीज वाहिनीमुळे या परिसरात मोठा अपघात घडण्याची प्रतीक्षा न करता वीज कंपनीने वाहिनी सुरक्षित अंतरावर लावावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: The time-line strategy of the MSEDCL is on the life of the citizens