शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

तोफ चोरी प्रकरणाचे धागेदोर हैदराबादपर्यंत!

By admin | Updated: January 2, 2015 00:37 IST

तपास सुरूच: आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता.

बुलडाणा : राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यातून २२ डिसेंबर रोजी झालेल्या तोफ चोरी प्रकरणाचे धागेदोरे हैदराबादपर्यंंत पोहोचले आहेत. ही तोफ हैदराबाद येथील एका तस्कराला विकली जाणार होती, अशी माहिती पोलीसांच्या हाती लागली असून, याप्रकरणातील आरोपी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तोफ चोरी प्रकरणात मुख्य आरोपी बाळू म्हस्के याच्यासह अटकेत असलेल्या इतर आरोपींची चौकशी सुरू असून, तपासामध्ये पोलिसांच्या हाती काही महत्वाचे धागेदोर लागले आहेत. चोरी केलेली तोफ पंचधातूची होती. त्यामध्ये सोन्याचे प्रमाण पाच ते सहा टक्के असू शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे ८५ किलोच्या या तोफेतील सोन्याची किंमतही कोटीच्या घरात जाते. ही तोफ ऐतिहासीक वस्तू म्हणून विकली तर, त्यापेक्षाही जास्त किमंत मिळू शकली असती. त्यामुळे बाळू म्हस्के हा हैदराबाद येथील एका तस्कराशी या तोफेचा सौदा करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती आता तपासातून समोर येत आहे. त्या अनुषंगाने पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. *एका आरोपीस पोलिस कोठडी तोफ चोरी प्रकरणात पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली होती. त्यापैकी चार आरोपी न्यायालयीन कोठडीत, तर एका आरोपीस ८ जानेवारीपर्यंंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. या चोरीप्रकरणात मुख्य आरोपी बाळू जगन्नाथ म्हस्के याच्यासह शंकर शिवाजी केवट, आकाश पंजाबराव निलख आणि सिद्धार्थ नामदेव काळे या चौघांना अटक करण्यात आली होती. या चारही आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. २८ डिसेंबर रोजी बोराखेडी बावरा येथील जगन किसन खरात याला सिंदखेडराजा पोलिसांनी बोराखेडी बावरा येथून अटक केली. जगन खरात याला न्यायालयात हजर केले असता, त्याला ८ जानेवारीपर्यंंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.