शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याला ठार मारून चोरट्यांनी बैल पळविले !

By admin | Updated: June 16, 2017 00:32 IST

गुन्हा दाखल: दोन बैलजोड्यांची किंमत एक लाख ५० हजार रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शेतातील गोठ्यात बांधलेल्या दोन बैलजोड्या चोरी करण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरटे गोठ्यात घुसले. चोरट्यांना पाहून कुत्रा भुंकू लागला. कुत्र्याच्या भुंकण्यामुळे आपली चोरी पकडली जाईल, या भीतीने चोरट्यांनी आधी कुत्र्याला ठार मारून गप्प केले आणि नंतर गोठ्यातील दावणीवरील दोन बैलजोड्या सोडून पळ काढला. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घुसर शेतशिवारात घडली. घुसर येथे राहणारे शेतकरी शेख मोहम्मद शेख इमाम यांचे घुसर ते अकोला मार्गावर वाघोबा ढाब्याजवळ शेत आहे. शेतातच गोठा आहे. या गोठ्यामध्ये त्यांची गुरे बांधलेली असतात, तसेच रखवालदारही तेथे असतो; मात्र बुधवारी रात्री पाऊस सुरू झाल्याने रखवालदार गोठ्याच्या मागे असलेल्या एका खोलीत झोपी गेला होता. गोठ्यात दोन बैलजोड्या दावणीला बांधलेल्या होत्या. दरम्यान, अज्ञात चोरटे बैल चोरण्याच्या उद्देशाने गोठ्यात शिरले. यावेळी चोरट्याच्या अंगावर तेथीलच एक कुत्रा भुंकू लागला. कुत्र्याच्या भुंकण्यामुळे आपली चोरी पकडली जाईल, या भीतीने चोरट्यांनी आधी कुत्र्याला ठार मारले आणि गोठ्यातील दावणीला बांधलेल्या दोन बैलजोड्या सोडून पळ काढला. सकाळी रखवालदार उठल्यावर त्याला कुत्रा मरून पडलेला दिसून आला आणि गोठ्यात बैलही दिसून आले नाहीत. त्याने ही माहिती मालकाला दिली. शेख मोहम्मद शेख इमाम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अकोट फैल पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.