शेतातील हरभरा चोरीच्या घटना वाढल्या!
तेल्हारा: तालुक्यात शेतकऱ्यांनी माेठ्या प्रमाणात हरभरा पिकाची लागवड केली आहे. शेतातील हरभरा रात्रीच्या सुमारास अज्ञात लोक चोरून नेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पूर्णा नदीपात्रातून वाळूची चोरी होत असल्याने, वाळू चोरटे शेतातील हरभराही चोरून नेत आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त घालून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तलवार घेऊन फिरणाऱ्या आरोपीस अटक
तेल्हारा: शहरातील अग्रसेन टॉवर चौकाकडे विनापरवाना तलवार घेऊन येणाऱ्या दिलीप भगवान चंदनशिव (वय, ३७ रा. इंदिरानगर) याला पोलीस कर्मचारी गणेश कायंदे यांनी २७ जानेवारी रोजी रात्री अटक केली. त्याच्याकडून धारदार तलवार जप्त केली. आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला.
रहदारीस अडथळा, गुन्हा दाखल
तेल्हारा: शहरातील बसस्थानकाजवळील रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी आरोपी सचिन अशोक तावरे (वय ३६, रा. इंदिरानगर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस कर्मचारी राजेश पिंजरकर यांनी केली.