चार हजार विद्यार्थ्यांपुढे प्रवेशाचे ‘टेंशन’!

By Admin | Updated: June 12, 2015 02:05 IST2015-06-12T02:05:16+5:302015-06-12T02:05:16+5:30

अकरावी प्रवेश; उत्तीर्ण विद्यार्थी २४ हजार, जागा मात्र २0 हजार.

Tension for admission of four thousand students! | चार हजार विद्यार्थ्यांपुढे प्रवेशाचे ‘टेंशन’!

चार हजार विद्यार्थ्यांपुढे प्रवेशाचे ‘टेंशन’!

नितीन गव्हाळे / अकोला : यंदा जिल्ह्यात दहावीचा ८५.६९ टक्के एवढा ह्यरेकॉर्डब्रेकह्ण निकाल लागला. या निकालामुळे विद्यार्थी व पालकांसमोर प्रवेशाची चिंता निर्माण निर्माण झाली आहे. जिल्ह्यात २४ हजार ३४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत; परंतु प्रत्यक्षात जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये २0 हजार ३७६ एवढय़ाच जागा असल्याने उर्वरित चार हजार विद्यार्थ्यांंपुढेप्रवेशाचा प्रश्न उभा राहणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वितरण करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांंची महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. १५ जूनपासून जिल्हय़ातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. सध्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशपत्रिकांच्या वितरणास सुरुवात झाली आहे. प्रवेशपत्रिका घेण्यासाठी उत्तीर्ण विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये गर्दी करीत आहेत. दहावीच्या परीक्षेला जिल्हय़ातून २८ हजार ४१५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २४ हजार ३४८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. जिल्हय़ात १९६ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यात १९ कनिष्ठ महाविद्यालयांची नव्याने भर पडली आहे. गत दोन वर्षांंपासून दहावीचा निकाल ८५ टक्क्यांपेक्षा अधिक लागत असल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांंची संख्या वाढली आहे. जिल्हय़ातील उत्तीर्ण विद्यार्थी आणि शिकण्यासाठी अकोल्यात येणार्‍या जिल्हय़ाबाहेरील विद्यार्थ्यांंची संख्याही मोठी आहे. त्यामुळे महाविद्यालय प्रवेशाचा गुंता आणखीच वाढणार आहे. त्यातही उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या सारखी आहे. माध्यमिक शिक्षण विभागाकडून महाविद्यालयातील जागांचा आढावा घेतला असता, २0 हजार ३७६ जागा आहेत आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांंची संख्या २४ हजार ३४८ च्या घरात आहे. यातील हजारएक विद्यार्थी आयटीआय, तंत्रशिक्षण, एमसीव्हीसीसारख्या शाखेत प्रवेश घेणार असले तरी विद्यार्थ्यांंमध्ये प्रवेशासाठी चांगलीच ओढाताण होणार आहे. ९0 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांंना प्रवेशाची पहिली संधी राहील. ९0 टक्क्यांवर गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांंची सर्वाधिक असल्याने, त्यांनाच फिशरीज, कम्प्यूटर सायन्स शाखेत प्रवेशास प्राधान्य दिले जाईल. ९0 पेक्षा कमी टक्केवारी असणार्‍या विद्यार्थ्यांंना मात्र या महत्त्वाच्या शाखांतील प्रवेशापासून मुकावे लागेल.

 

Web Title: Tension for admission of four thousand students!