रेणुका नगरमध्ये दीड लाखांची घरफोडी

By Admin | Updated: June 14, 2017 02:16 IST2017-06-14T02:16:24+5:302017-06-14T02:16:24+5:30

अकोला: डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेणुका नगर येथील एका घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उजेडात आली.

Ten lakhs of burglary in Renuka Nagar | रेणुका नगरमध्ये दीड लाखांची घरफोडी

रेणुका नगरमध्ये दीड लाखांची घरफोडी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेणुका नगर येथील एका घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उजेडात आली. या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रेणुका नगरमधील रहिवासी रमेश जयदेव मांगटे यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री धुडगूस घालत ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चेन, सोन्याचे कानातले आणि बांगड्या आहेत. एकूण ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरी करून लंपास केले असून, हा प्रकार मांगटे यांच्या मंगळवारी पहाटे निदर्शनास आला. त्यानंतर या प्रकरणाची माहिती डाबकी रोड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Ten lakhs of burglary in Renuka Nagar