शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
2
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
3
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
4
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
5
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
7
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
8
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
9
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
10
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
11
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
12
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
13
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
14
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
15
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
16
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
17
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
18
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
19
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
20
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

काेरोनामुक्तीनंतर फुप्फुसांसोबतच हृदयही सांभाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 11:38 IST

Akola News : कोविडच्या संसर्गाचा शरीरातील फुप्फुस, किडनी, लिव्हर, हृदय यासह इतर अवयवांवर परिणाम होतो.

ठळक मुद्देछातीत दुखणे, दम लागणे आदी लक्षणांकडे दुर्लक्ष टाळावेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

अकोला : कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांना फुप्फुसांशी निगडित फायब्रोसिस आजाराची लक्षणे समोर आली आहेत. या सोबतच रुग्णांमध्ये हृदयाशी निगडित तक्रारीदेखील येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर हृदयाचे ठोके कमी अधिक होणे, छातीत दुखणे, चक्कर येणे, धाप लागणे आदी सामान्य तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणे आढळताच रुग्णांनी तत्काळ वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावा, असे आवाहन सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत सुमारे ७० रुग्णांनी पोस्ट कोविड उपचार घेतले आहेत. यातील बहुतांश रुग्णांमध्ये फुप्फुसाच्या फायब्रोसिसशी संबंधित लक्षणे आढळली आहेत. याचसोबत काही रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित लक्षणेही दिसून आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. कोविडच्या संसर्गाचा शरीरातील फुप्फुस, किडनी, लिव्हर, हृदय यासह इतर अवयवांवर परिणाम होतो. आधीच दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांवर तसेच तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर परिणामांची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोरोनामुक्तीनंतर वैद्यकीय सल्ल्याने योग्य उपचार, व्यायाम आणि आहार घेऊन हृदयाची धडधड सांभाळा, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

अनेकांची कार्यक्षमता होते कमी

सर्वोपचार रुग्णालयातील तज्ज्ञांच्या मते, कोरोनामुक्तीनंतर अशक्तपणा जाणवणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांची कार्यक्षमता कमी होत असल्याने प्रतिकारशक्ती विकसित होण्यास कालावधी लागतो. त्यामुळे अनेकांमध्ये अशक्तपणा जाणवतो. यावर वैद्यकीय सल्ला, पुरेशी विश्रांती, व्यायाम आणि योग्य आहार महत्त्वाचा आहे.

 

ही लक्षणे ओळखा

कोरोनातून बरे झाल्यानंतर चालताना दम लागणे, छातीत दुखणे, चक्कर येणे, जीव घाबरणे आदी लक्षणे आढळून येतात. ही लक्षणे हृदयरोगाशी निगडित असू शकतात. त्यामुळे परस्पर औषधोपचार न करता, तज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात येते.

 

कोरोनातून बरे झालेल्या व पोस्ट कोविड तपासणी केलेल्या काही रुग्णांमध्ये फुप्फुसाच्या फायब्रोसिसशी संबंधित लक्षणे आढळत आहेत. याशिवाय रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित तक्रारीही समोर येऊ शकतात. कोरोनानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन गुंतागुंत वाढू शकते. त्यामुळे वेळीच काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

 

- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, औषध वैद्यकशास्त्र विभाग, जीएमसी

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या