‘स्वाइन फ्लू’ रुग्णांच्या थुंकीचे नमुने घेतले

By Admin | Updated: February 18, 2015 02:10 IST2015-02-18T02:10:54+5:302015-02-18T02:10:54+5:30

अकोल्यातही आढळले स्वाइन फ्लू चे संशयित रूग्ण.

"Swine Flu" patients received sputum samples of patients | ‘स्वाइन फ्लू’ रुग्णांच्या थुंकीचे नमुने घेतले

‘स्वाइन फ्लू’ रुग्णांच्या थुंकीचे नमुने घेतले

अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात दाखल असलेल्या स्वाइन फ्लू संशयित सहा रुग्णांचे नमुनेच घेतले नसल्याचा प्रकार लोकमतने उजेडात आणल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने मंगळवारी या रुग्णांचे थुंकीचे नमुने घेतले. हे नमुने तपासणीसाठी पुणे येथील लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यात स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह असलेले दोन रुग्ण आढळल्यानंतर सहा संशयित रुग्णांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले; मात्र रविवारपासून उपचारासाठी दाखल असलेल्या या रुग्णांचे महाविद्यालय प्रशासनाने सोमवारपर्यंत थुंकीचे नमुने घेतले. ते पुणे येथील लॅबमध्ये चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अंतिम वर्षाला असलेल्या सुरेश सिंहला आणि वाशिम येथील रहिवासी अरुणा रामप्रकाश अवचार हे स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यासोबतच वाशिम येथील जयश्री हरीश वानखडे (१९), योगिता सुनील राक्षसकर (२१, अमरावती), सुशील सुधाकर कोकाटे (३४, तेल्हारा), रेशमा नीलेश राठोड (२२, जनुना, बाश्रीटाकळी) आणि माला संजय शिंदे (२८, दाळंबी, बोरगाव), राजेश नवृत्ती गोराळे (३९ रा. धरणगाव, बुलडाणा) यांना स्वाइन फ्लू संशयित म्हणून वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यामधील सुशील कोकाटे आणि जयश्री वानखडे यांच्या थुंकीचे नमुने मंगळवारी घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी येथे पाठविण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह असलेल्या दोन्ही रुग्णांची प्रकृती ठीक असल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ तीन रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: "Swine Flu" patients received sputum samples of patients