शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन वाचविण्यासाठी धावपळ!

By admin | Updated: October 27, 2014 01:33 IST

दुस-या दिवशीही अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस

अकोला: जिल्ह्यात दुसर्‍या दिवशीही (रविवारी) ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाने हजेरी लावल्याच्या स्थितीत कापणीला आलेल्या आणि कापणीनंतर शेतात गंजी लावलेल्या सोयाबीनचे पीक वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे. शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस झाला. रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी आणि खरीप हंगामातील कपाशी पिकासाठी हा अवकाळी रिमझिम पाऊस उपयुक्त असल्याचे मानले जाते. दुसर्‍या दिवशी म्हणजेच रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते, अधून-मधून अवकाळी रिमझिम पाऊसही सुरू होता. पावसाच्या या वातावरणात शेतात कापणीला आलेले सोयाबीन आणि कापणी झालेल्या शेतातील सोयाबीनचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने का पणीनंतर शेतातच लावण्यात आलेल्या सोयाबीनच्या गंज्या पावसामुळे भिजू नयेत, यासाठी सोयाबीनच्या गंजीवर ताडपत्री टाकून, पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांची सर्वत्र लगबग सुरू असल्याचे दिसत आहे. आधीच यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अल्प पावसामुळे मूग, उडिदाचे पीक हातून गेले असताना, सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली आहे. एकरी ५0 किलो ते एक क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होत असल्याने शे तकरी हवालदिल झाला आहे. त्यातच आता ढगाळ व पावसाच्या वातावरणात हाताशी आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यानुषंगाने पावसाच्या वातावरणात सोयाबीन पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.