शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

रविवार पावसाचा!

By admin | Updated: September 8, 2014 01:05 IST

अकोला जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार; धरणांच्या पातळीतही वाढ.

अकोला: रविवारचा दिवस पावसाचा ठरला. सकाळी ८ वाजतापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण जिल्ह्यातील नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठय़ातही वाढ झाली. काटेपूर्णा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपर्यंत धरणाच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अकोला शहरात रात्री ८.३0 पर्यंत ६८.0८ मि.मी. पावसाची नोंद झाली. यंदाच्या पावसाळ्य़ात १२ तासात पडलेला सर्वाधिक पाऊस आहे. गेल्या २८ ऑगस्टपासून जिल्ह्यात अधून-मधून पाऊस हजेरी लावत आहे. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते, सकाळी ९.३0 वाजतापासून अकोला जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस सुरू झाला. जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा आणि मूर्तिजापूर या सातही तालुक्यात दमदार पाऊस बरसला. दिवसभर पाऊस सुरू राहिल्याने शहरासह जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत होते. आणखी काही दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास पिके पिवळी होण्याची शक्यता आहे. बरसलेल्या सार्वत्रिक पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठय़ातही काही प्रमाणात वाढ झाली. शहरातील रस्त्यावर तसेच सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. रात्री ८ वाजता वान धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. तसेच बाळापूर तालुक्यातील मन प्रकल्पाचे दोन दरवाजे प्रत्येकी चार इंचप्रमाणे उघडण्यात आले

. ** अकोल्यात ६८.0८ मि.मी.पाऊस!

अकोला शहरात रात्री ८.३0 वाजेपर्यंत सुमारे ६८.0८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सुरू असलेल्या पावसाच्या पृष्ठभूमीवर रात्री पावसाच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.

** पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

 बरसलेल्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील विसरोळी, शारगड, शहानूर, सपन व इतर प्रकल्पांमधील पाणी रविवारी सायंकाळी सोडण्यात आले. त्यामुळे पूर्णा नदीला पूर येणार असल्याने, जिल्हा प्रशासनामार्फत पूर्णा नदीकाठच्या जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी दक्ष राहून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

धरणांची स्थिती (रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

धरण

काटेपूर्णा 28.62

मोर्णा44.95

निगरुणा82.56

उमा18.90

दगडपारवा 00.00

वान90.43 रविवारी

सकाळी ८.३0 वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यातील सरासरी पाऊस! तालुका मि.मी. अकोला0२.00 आकोट 00.२५ तेल्हारा 00.0३ बाळापूर00.0४ मूर्तिजापूर१२.00 बाश्रीटाकळी 00.00 पातूर 00.00 सरासरी पाऊस00.७१