दहावी नापास विद्यार्थ्यांंनाही आता ‘आयटीआय’ प्रवेश

By Admin | Updated: June 15, 2015 01:47 IST2015-06-15T01:47:02+5:302015-06-15T01:47:02+5:30

नोंदणीसाठी २४ जून अंतिम दिवस

The students of SSC exam | दहावी नापास विद्यार्थ्यांंनाही आता ‘आयटीआय’ प्रवेश

दहावी नापास विद्यार्थ्यांंनाही आता ‘आयटीआय’ प्रवेश

अकोला : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया ५ जूनपासून सुरू झाली असून, यंदाच्या नवीन शैक्षणिक सत्रात दहावी नापास विद्यार्थ्यांंनादेखील आयटीआयमध्ये प्रवेश मिळणार आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांंचे मनोधैर्य वाढणार आहे.
नुकताच दहावीचा निकाल लागला असून, अनेक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आता विविध क्षेत्रातील अभ्यासक्रम निवडण्यात गुंतलेले आहेत. दुसरीकडे नापास विद्यार्थ्यांंच्या मोठय़ा गटामध्ये निराशा पसरलेली आहे. नापास विद्यार्थ्यांंना मुक्त विद्यापीठाचा पर्याय उपलब्ध असला तरी फारसे विद्यार्थी याकडे वळत नाही. परिणामी यातील काही विद्यार्थी पुन्हा परीक्षेच्या तयारीला लागले असले तरी, अनेकांनी पुढील शिक्षणाच्या आशा सोडून खासगी दुकानांमध्ये काम करण्याचा निर्धार केल्याचे वास्तव आहे. परंतु, यंदा नवीन शैक्षणिक सत्रासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत काही अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्हतेत बदल करण्यात आल्याने दहावी नापास विद्यार्थ्यांंंंंंनादेखील आयटीआयमध्ये प्रवेश मिळणार आहे. या अभ्यासक्रमासाठी मागील वर्षीपर्यंंंंंंत इयत्ता आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक होते, परंतु शासनाच्या नवीन निर्णयानुसार आठवी उत्तीर्ण प्रवेशाची अट काढण्यात आली असून, आता दहावी नापास विद्यार्थ्यांंना प्रवेश मिळणार आहे. दहावी नापास विद्यार्थ्यांंनाही आता आयटीआयचा पर्याय उपलब्ध झाल्याने अनेक विद्यार्थी शैक्षणिक नुकसानापासून बचावल्या जाणार आहेत. व्यावसायिक शिक्षणाचे कौशल्य अंगी असल्यामुळे या विद्यार्थ्यांंना स्वत:च्या व्यवसायातून आपले करिअर घडविता येणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवीन आशा पल्लवित झाल्या आहेत.

Web Title: The students of SSC exam