शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सहा घरांना आग; साहित्य खाक

By admin | Updated: May 6, 2015 01:00 IST

मूर्तिजापूूर तालुक्यातील शेतकरी कुटुंबांची लाखो रुपयांची हानी.

मूर्तिजापूूर : तालुक्यातील गुंजवाडा येथे शेतकर्‍यांच्या सहा घरांना मंगळवारी आग लागली. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे साहित्य खाक झाले. आधीच नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. आता आगीत घरातील साहित्य खाक झाले. आगीत धान्य व कुटारही खाक झाले. त्यामुळे शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे. गुंजवाडा येथील पात्रे कुटुंबातील पुरुष सदस्य हिरपूर येथे लग्नाला गेले होते. मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. आगीत मोहन पात्रे, श्याम पात्रे, राम पात्रे, साहेबराव पात्रे, हिंमतराव पात्रे, सुधाकरराव पात्रे यांच्या घरातील साहित्य खाक झाले. घराच्या बाजूला कुटार ठेवण्यात आले होते. आगीत तीन गंजी चारा, १५ ट्रॉली कुटार खाक झाले. थ्रेशर मशीनचे टायर, वायर आणि इतर साहित्यही जळाले. आगीची माहिती मिळताच मूर्तिजापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळावर धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आगीत पाच लाखांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.