शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीं’ची पालखी जिल्ह्यात दाखल!

By admin | Updated: June 1, 2017 01:28 IST

अकोला: विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या शेगाव नगरीचे संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन झाले असून शुक्रवार २ जून रोजी २ दिवसांच्या मुक्कामाकरिता अकोला नगरीत आगमण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या शेगाव नगरीचे संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन झाले असून शुक्रवार २ जून रोजी २ दिवसांच्या मुक्कामाकरिता अकोला नगरीत आगमण होत आहे. गत ४१ वर्षापासून येथील श्री गजानन महाराज शेगाव पालखी उत्सव समितीच्या वतीने या पालखीचे स्वागत व नगरवासीयांना शिस्तद्धपणे व शांततेत दर्शन घडवून देण्याची किमया यशस्वीपणे पार पाडीत आहे. हे सर्वांना माहितीच आहे.यावर्षीही ही परंपरा पुढे नेत श्रींच्या पालखीचे स्वागत अधिक जोमात व हर्षोल्हासात व्हावे म्हणून समितीच्या वतीने जय्यत तयारी सुरू केली आहे. २ जून रोजी सकाळी श्रींची पालखी महानगरात दाखल होत असून, जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात पालखीच्या पहिल्या दिवसाचा सकाळी तात्पुरता मुक्काम राहील. जेथे पालखीसह आलेल्या वारकऱ्यांची चहा-फराळाची व्यवस्था करण्यात येईल. तसेच श्रींच्या भक्तांना दर्शनाकरिता ही पालखी सकाळी ९ वाजेपर्यंत उपलब्ध राहील. तेथून पालखी पुढील मार्गक्रमणाकरिता निघेल. गोडबोले प्लॉट, डाबकी रोड मार्गे, संत ज्ञानेश्वर मंदिर, कस्तुरबा हॉस्पिटलच्या मागून, शिवचरण मंदिर मार्गे, विठ्ठल मंदिर काळा मारोती रोड, लोखंडी पुलावरून, टिळक रोड, अकोट स्टॅन्ड, दीपक चौक, कलालच्या चाळीसमोरून, जुना वाशिम स्टॅन्ड, चांदेकर चौक मार्ग, पंचायत समिती रोड, कालंका माता बाजोरिया विद्यालय येथे मुक्काम राहील. येथे भक्तांना रात्री सहपरिवार दर्शनाचा व शेगावचा धर्तीवर प्रसादाचा लाभ घेता येईल. नंतर, भजन, कीर्तन व श्री गजानन महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येथे दाखविण्यात येईल.