शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान शाखेच्या सात हजारांवर जागा!

By admin | Updated: June 14, 2017 02:02 IST

प्रवेशासाठी समिती गठित: दहा केंद्रांवरून होईल प्रवेश प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : इयत्ता दहावीचा निकाल लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार आहे आणि अकोला शहरातील ५३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय आॅफलाइन पद्धतीने अकरावीचे प्रवेश होणार आहेत. ५३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण ७ हजार ९६० विज्ञान शाखेच्या जागा आहेत. या जागांवर केंद्रीय पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने होणार की नाहीत, याविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये चर्चा रंगली होती. दरवर्षी महाविद्यालयातील व्यवस्थापन परिषदेकडून विद्यार्थ्यांची प्रक्रिया राबविली जात हेती. विद्यार्थ्यांनी २०० ते ३०० रुपये किमतीचे प्रवेश अर्ज विक्रीतून कनिष्ठ महाविद्यालयांना लाखो रुपये मिळत होते, तसेच अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच कनिष्ठ महाविद्यालये प्रवेश देण्यास पसंती देत होती. कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी झगडावे लागत होते. त्यासाठी भरमसाट डोनेशन घेऊन कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जात होता; परंतु केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांकडून डोनेशन आणि प्रवेश अर्ज विक्रीतून पैसा मिळणार नसल्याने कनिष्ठ महाविद्यालय आणि शिकवणी वर्ग संचालक केंद्रीय प्रवेश पद्धतीला विरोध करीत होते. त्यासाठी त्यांनी लॉबिंगसुद्धा सुरू केली होती; परंतु शासनाने निकालापूर्वी शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याने अकरावीच्या केंद्रीय आॅफलाइन प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे वाढलेला कल लक्षात घेता, केंद्रीय आॅफलाइन प्रवेश प्रक्रिया केवळ विज्ञान शाखेसाठी राबविण्यात येणार आहे. सद्यस्थितीत ५३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ७ हजार ९६० विज्ञान शाखेच्या जागा आहेत. या जागांवर विद्यार्थ्यांना केंद्रीय पद्धतीने प्रवेश दिल्या जाणार आहे. प्रवेशासाठी समिती गठित अकरावीचे प्रवेश केंद्रीय आॅफलाइन पद्धतीने करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. समितीमध्ये कार्याध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. विजय नानोटी, शत्रुघ्न बिरकड, सचिव गजानन चौधरी, सहसचिव संजय देशमुख, कोषाध्यक्ष विलास अत्रे, सदस्य म्हणून पुरुषोत्तम लांडे, दाभाडे, विनायक देशमुख, आनंद साधू, हरीश बुंदेले, प्रेमकुमार सानप, प्रा. प्रकाश डवले यांचा समावेश आहे.प्रवेशासाठी असा करता येईल अर्जअकरावी केंद्रीय आॅफलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी रालतो विज्ञान महाविद्यालय प्रमुख केंद्र राहील. या केंद्रासह नऊ उपकेंद्र राहतील. या दहा केंद्रांवर संगणकाचा वापर करून विद्यार्थ्यांना आॅफलाइन प्रवेश अर्ज भरावा लागेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना १०० रुपयांमध्ये प्रवेश उपलब्ध केला जाईल. प्रवेश अर्जामध्ये कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम राहील. विद्यार्थ्यांना अर्जामध्ये पसंतीक्रम टाकावा लागेल. विद्यार्थ्यांची टक्केवारी आणि जातीच्या प्रवर्गानुसार प्रवेश दिला जाईल. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया समिती वेळापत्रक तयार करणार आहे.