शिक्षिकेचे लैंगिक शोषण करणारा संस्था सचिव कारागृहात

By Admin | Updated: May 24, 2014 20:06 IST2014-05-24T00:20:25+5:302014-05-24T20:06:41+5:30

पातूर येथील एका शिक्षिकेवरील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीची कारागृहात रवानगी.

The Secretary of the School for Sexual Harassment in the Prison | शिक्षिकेचे लैंगिक शोषण करणारा संस्था सचिव कारागृहात

शिक्षिकेचे लैंगिक शोषण करणारा संस्था सचिव कारागृहात

अकोला : पातूर येथील एका शिक्षिकेवरील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी संस्थेच्या सचिवाला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी १७ मे रोजी अटक केली होती. २३ मे रोजी आरोपीच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत अत्याचार केल्याची तक्रार एका ४० वर्षीय सहायक शिक्षिकेने पातूर पोलिस ठाण्यात दिली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी ३१ ऑक्टोबर २0१३ रोजी संस्था सचिव सैयद कमरोद्दीन सैयद इस्माईलसह शेख आरिफ शेख गफ्फार, अब्दुल जब्बार अब्दुल गफ्फार, मोहम्मद साजेद मोहम्मद सादीक, शेख आसिफ शेख वाहेद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी शेख आरिफ शेख गफ्फार, अब्दुल जब्बार अब्दुल गफ्फार, मोहम्मद साजेद मोहम्मद सादीक, शेख आसिफ शेख वाहेद या आरोपींना अटक केली. संस्था सचिव सैयद कमरोद्दीन हा फरार झाला होता. आरोपी सैयद कमरोद्दीन याने ३० एप्रिल २०१४ रोजी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता; परंतु न्यायालयाने अर्ज फेटाळला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही त्याचा अर्ज फेटाळला. 

Web Title: The Secretary of the School for Sexual Harassment in the Prison