शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात कचर्‍याचे ढीग

By admin | Updated: September 4, 2014 01:31 IST

अकोला मनपातील अधिकारीच उदासीन; कचरा उचलण्याचा आराखडा कागदावरच

अकोला : शहराच्या कानाकोपर्‍यात साचलेली घाण व कचर्‍याचे ढीग उचलण्यासाठी मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार झोननिहाय ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्याचा आराखडा केवळ कागदोपत्री राबवल्या जात आहे. ठिकठिकाणी साचलेले कचर्‍याचे ढीग पाहता, महा पालिकेचे संबंधित अधिकारीच उदासीन असल्याचे चित्र आहे. शहरात घाणीने गच्च भरलेल्या नाल्या-गटारे, व ठिकठिकाणी साचणार्‍या कचर्‍याच्या समस्येला अकोलेकर वैतागले आहेत. आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या कालावधीत पहिल्यांदाच नाला सफाईचे काटेकोर पणे नियोजन करण्यात आले. असे असताना आजमितीस मोठय़ा नाल्यांमधील घाण लक्षात घेतल्यास, नाले सफाई कितपत झाली, यावर प्रश्नचिन्ह आहे. शहराच्या विविध भागात दहा-दहा दिवस कचरा उचलला जात नसल्याचे रडगाणे आहे. कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराने कचरा उचलण्यासाठी २0 ट्रॅक्टर लावले असून, नियमित कचरा उचलण्याचा दावा केला जातो. असे असतानासुद्धा शहरा त कचर्‍याचे ढीग साचल्याची वस्तुस्थिती आहे. या पृष्ठभूमीवर आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी कचरा उचलण्यासाठी नागरिकांच्या दिमतीला झोननिहाय एकूण १९ ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. ही जबाबदारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी व पर्यवेक्षकांवर सोपवली होती.शिवाय तातडीच्या कामासाठी सर्व प्रभागांकरिता एक ट्रॅ क्टर नेहमीसाठी कार्यरत राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. अर्थातच, ही जबाबदारी पार पाडण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी तत्पर असणे क्रम प्राप्त असताना, तसे होत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे आयुक्तांनी अकोलेकरांसाठी तयार केलेल्या स्वच्छता आराखड्याची ऐसीतैशी झाली आहे. (प्र ितनिधी)*अस्वच्छतेमुळेच आजारांची साथप्रभागात ठिकठिकाणी घाण पाण्याची डबके साचली असून, सर्व्हिस लाईन कचर्‍याने तुंबल्या आहेत. गाजर गवत, काटेरी झुडपे वाढली असून फवारणी होत नसल्याने डासांची पैदास वाढली आहे. परिणामी सवरे पचार रूग्णालयासह शहरातील सर्व लहान-मोठी खासगी रुग्णालये रुग्णांच्या गर्दीमुळे खच्चून भरली आहेत. अस्वच्छतेमुळे आजारांची साथ असली तरी महापालिका व नगरसेवकांना याचे कोणतेही सोयर सुतक नाही, हे विशेष.