शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ठरावाला ठेंगा; फोर-जीचे खोदकाम सुरूच!

By admin | Updated: September 7, 2014 01:38 IST

अकोल्यात फोर जी केबलच्या खोदकामावर आक्षेप; नगरसेवक टाले यांची पोलिसात तक्रार.

अकोला : शहरात मनमानी पद्धतीने खोदकाम करून जलवाहिन्यांचा सत्यानाश करणार्‍या मोबाईल कंपन्यांचे खोदकाम बंद करण्याचा ठराव मनपाच्या सभागृहात घेण्यात आला हो ता. या ठरावाला ठेंगा दाखवत मोबाईल कंपन्यांनी खोदकाम करण्यासह जलवाहिन्यांची तोडफोड सुरूच ठेवल्याने संतप्त झालेल्या नगरसेवक बाळ टाले यांनी ५ खदान पोलिस ठाण्यात कंपनीविरोधात तक्रार दिली. या प्रकारामुळे कार्यकारी अभियंत्यांसह शहर अभियं त्यांची भूमिक ा संशयास्पद ठरत आहे. फोर-जी सुविधा पुरविण्यासाठी शहरात रिलायन्स व वोडाफोन या मोबाईल कंपन्यांच्याव तीने खोदकाम सुरू आहे; परंतु दोन्ही कंपन्यांनी खोदकामादरम्यान जलवाहिन्यांची मोठय़ा प्रमाणावर तोडफोड केल्याची वस्तुस्थिती आहे. शिवाय तोडलेल्या जलवाहिन्या दुरुस्तीसाठी कंपन्यांच्यावतीने टाळाटाळ होत असल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. असाच प्रकार २0 जुलै रोजी प्रभाग क्र.३१ मधील गोरक्षण रोड भागात घडल्याने संतप्त नागरिकांनी मोबाईल कंपन्यांच्या वाहनांची तोडफोड केली होती. दुसर्‍याच दिवशी २१ जुलै रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेने कंपन्यांचे खोदकाम बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला होता. तरी सुद्धा प्रभाग क्र.३१ मध्ये मोबाईल कंपनीच्यावतीने खोदकाम करण्यात येऊन पुन्हा जलवाहिनी तोडल्याचा प्रकार ५ सप्टेंबर रोजी घडला. या प्रकारामुळे संतप्त झालेले भाजप नगरसेवक बाळ टाले यांनी कंपनी विरोधात खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी मोबाईल कंपनीचे साहित्य व ट्रक ताब्यात घेतला. पंरतु, कंपनीच्या विरोधात ठोस पावले उचलण्यास मनपासह पोलिस प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नगरसेवक टाले यांनी केला आहे.