शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रिपब्लिकन ऐक्यासाठी गवई, आंबेडकरांशी चर्चा करणार - आठवले

By admin | Updated: August 28, 2015 23:56 IST

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना १५ लाखांची मदत देण्याची मागणी आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.

अकोला : गटातटात विभागून न राहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील एकच रिपब्लिकन पक्ष असला पाहिजे, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष तथा खासदार रामदास आठवले यांनी शुक्रवारी व्यक्त केले. रिपब्लिकन ऐक्य केवळ बौद्ध समाजाचे न होता, सर्व समाजाचे झाले पाहिजे, असे सांगत रिपब्लिकन ऐक्यासाठी आपण राजेंद्र गवई व अँड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलून प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त अकोला दौर्‍यावर आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सध्या शासनाकडून प्रत्येकी एक लाखाची मदत दिली जाते. मात्र, ही मदत अत्यंत कमी आहे. त्यांना किमान १५ लाखांची मदत देण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांशी लवकरच चर्चा करणार असल्याचे खा. आठवले यांनी सांगितले. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यासाठी शासनाने कार्यक्रम राबवून आंतरजातीय विवाह करणार्‍या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाखांची मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. आंतरजातीय विवाहामुळे समाज एकत्र येण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले. मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास समाजाला आरक्षण मिळावे, अशी आमची भूमिका असून, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय उशिराने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जातीला आरक्षण देण्यात यावे, मात्र हे आरक्षण देताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता निर्णय घेण्यात यावा, तसेच धनगर समाजाला व मुस्लीम समाजालाही आरक्षण देण्याचा विचार शासनाने करावा. आरक्षण सर्वांनाच हवे आहे. त्यासाठी संसदेने कायदा करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याची गरज!

         विदर्भात शेतकरी आत्महत्या मोठय़ा प्रमाणात होत आहेत. शेतकर्‍यांना मदतीचे पॅकेज योग्य प्रमाणात दिले जात नाही. त्यामुळे विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची गरज असल्याचे खा. आठवले यांनी सांगितले. विदर्भाने मुंबईवर विसंबून राहणे चालणार नाही. याबाबत केंद्र सरकारने विचार करावा. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले. यासाठी शिष्टमंडळाने विदर्भ राज्याची भूमिका केंद्र सरकारला पटवून द्यावी, असेही ते म्हणाले.