धार्मिक स्थळांचा अहवाल जिल्हाधिका-यांकडे!

By Admin | Updated: February 28, 2015 02:08 IST2015-02-28T02:08:02+5:302015-02-28T02:08:02+5:30

जिल्हास्तरीय समितीच्या निर्णयाकडे लक्ष.

Religious places report to district collector! | धार्मिक स्थळांचा अहवाल जिल्हाधिका-यांकडे!

धार्मिक स्थळांचा अहवाल जिल्हाधिका-यांकडे!

अकोला: महापालिका प्रशासनाने तयार केलेला ७८२ धार्मिक स्थळांचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला. २९ सप्टेंबर २00९ पूर्वीच्या धार्मिक स्थळांच्या अहवालाची पडताळणी केल्यानंतर जिल्हास्तरीय समिती अंतिम निर्णय घेईल. समिती काय निर्णय घेते, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. मनपा क्षेत्रात उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळांचा सर्व्हे करून अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. यामध्ये २९ सप्टेंबर २00९ पूर्वीच्या अधिकृत धार्मिक स्थळांची मंजुरी कायम ठेवायची किंवा नाही, याची पडताळणी करून जिल्हास्तरीय समितीला निर्णय घ्यायचा आहे. खासगी जागा वगळता शासकीय जमीन, मुख्य रस्ते तसेच सार्वजनिक जागेवर उभारण्यात आलेली धार्मिक स्थळे हटविण्याच्या शासनाच्या आदेशानुसार मनपाने विविध धार्मिक स्थळांचा सर्व्हे केला. यामध्ये मंदिर, मशीद, बुद्ध विहार, दर्गा, चर्च आदींचा समावेश आहे. धार्मिक स्थळांच्या विश्‍वस्तांनी मनपाकडे सादर केलेले दस्तऐवज व सर्वेक्षणाच्या दस्तऐवजाची पडताळणी करण्याचे काम नगर रचना विभागाकडून सुरू होते. सदर अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्यात आला.

Web Title: Religious places report to district collector!