शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा ‘जीएमसी’त गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 2:47 PM

नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने वार्ड क्रमांक सहामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : किडनीच्या रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयात घडली. यावेळी रुग्णाच्या संतापलेल्या नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने वार्ड क्रमांक सहामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती.तेल्हारा तालुक्यातील इसापूर येथील रहिवासी रामेश्वर बोर्डे (४५) यांना किडनीची समस्या असल्याने त्यांना गुरुवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाच्या प्राथमिक तपासणीनंतर त्यांची सोनोग्राफी करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रामेश्वर बोर्डे यांच्या नातेवाइकांनी त्यांना सोनोग्राफीसाठी सोनोग्राफी कक्षात नेले; परंतु त्या ठिकाणी एकही सोनोग्राफी तंत्रज्ञ किंवा डॉक्टर उपस्थित नसल्याने रुग्णाला तेथेच तात्कळत बसावे लागल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाइकांनी दिली. रुग्णाच्या पोटाचा त्रास वाढल्याने नातेवाइकांनी त्यांना वार्ड क्रमांक सहा मध्ये नेले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी रुग्णाची वैद्यकीय तपासणी केली; परंतु उपचारादरम्यान रामेश्वर बोर्डे यांचा मृत्यू झाला. योग्य उपचार न मिळाल्याने रुग्णाच्या नातेवाइकांनी चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे वार्ड क्रमांक सहामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. सुरक्षा गार्डच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात आली.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय