जुगार क्लबवर छापा; १० अटकेत

By Admin | Updated: June 15, 2017 01:22 IST2017-06-15T01:22:04+5:302017-06-15T01:22:04+5:30

जमावाने केला पोलिसांवर दबावाचा प्रयत्न, विशेष पथकाने हाताळली परिस्थिती

Raid on gambling club; 10 arrest | जुगार क्लबवर छापा; १० अटकेत

जुगार क्लबवर छापा; १० अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खैर मोहम्मद प्लॉट येथील अंसारच्या वरली अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी बुधवारी छापा टाकून दहा जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी १७ हजार ५०० रुपये रोखसह ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
खैर मोहम्मद प्लॉटमध्ये अंसार याचा गेल्या अनेक दिवसांपासून वरली अड्डा सुरू आहे. खुलेआम सुरू असलेल्या या वरली अड्ड्याला डाबकी रोड पोलिसांचे अभय असल्याचे दिसून येत आहे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाईमुळे डाबकी रोड पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा चेहरा उघड झाला आहे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी केलेल्या कारवाईनंतर अन्सारच्या जुगार अड्ड्यावरून भागवतवाडी येथील रहिवासी शेख गफ्फार शेख सत्तार (५५), नायगाव येथील अब्दुल जाफर अब्दुल जब्बार (२९), मोहम्मद सलमान मोहम्मद दस्तबीर (२१), भागवतवाडी येथील भामीरोहीन फमोद्दीन (६५), वानखडे नगरातील अरुण यादवराव देशमुख (५६), नेहरु नगरातील रहिवासी सय्यद मुझफ्फर सय्यद इब्राहीम (४३), जुना चहाचा कारखाना परिसरातील रहिवासी प्रकाश ओंकार धुमोने (४१), अकोट फैलातील रहिवासी राजू बबन घोडके (३५), वाशिम बायपास परिसरातील रहिवासी नितीन काशीराम पळसपगार (४५) या दहा जुगारींना अटक केली. पथकाने घटनास्थळावरून जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य, मोबाईल व १७ हजार ५०० रुपये रोख असा एकूण ३९
हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, या कारवाईनंतर जुगारींना अटक करून पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना पथकाला परिसरातील नागरिकांनी अडविण्याचा प्रयत्न केला, यासोबतच विशेष पथकावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला; मात्र विशेष पथकाने या जमावाला न जुमानता सदर १० आरोपींना अटक करून पोलीस ठाण्यात आणले.

Web Title: Raid on gambling club; 10 arrest