शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएमसी’मध्ये रॅगिंंग: तीन विद्यार्थिनींना प्रत्येकी २५ हजारांचा दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 11:42 IST

विद्यार्थिनीला मानसिक त्रास झाल्याबद्दल तिन्ही दोषी विद्यार्थिनींवर प्रत्येकी २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूती व स्त्री रोगशास्त्र विभागातील बहुचर्चित रॅगिंग प्रकरणी गुरुवारी अ‍ॅन्टी रॅगिंग समितीची अंतिम बैठक पार पडली. बैठकीत सादर अहवालानुसार, तक्रारकर्त्या विद्यार्थिनीला मानसिक त्रास झाल्याबद्दल तिन्ही दोषी विद्यार्थिनींवर प्रत्येकी २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.उच्चस्तरीय समितीने चौकशी अहवाल वैद्यकीय संचालकांकडे सादर केल्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या अ‍ॅन्टी रॅगिंग समितीच्या महत्त्वाच्या बैठकीत तिन्ही विद्यार्थिनींना रॅगिंग प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर झालेल्या चौकशीच्या आधारे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी गुरुवार, १२ डिसेंबर रोजी अ‍ॅन्टी रॅगिंग समितीच्या बैठकीत अंतिम अहवाल सादर केला. त्यानुसार, तक्रारकर्त्या विद्यार्थिनीला केलेले आरोप सिद्ध करता आले नाही; परंतु कामाच्या वेळी झालेल्या वादातून तिला मानसिक त्रास झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे तिन्ही वरिष्ठ विद्यार्थिनींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय, यानंतर पीडित विद्यार्थिनीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असाही समज तिन्ही विद्यार्थिनींना देण्यात आला.

प्रकरण पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यता

अ‍ॅन्टी रॅगिंग समितीच्या बैठकीनंतर हे प्रकरण येथेच समाप्त करण्यात आले आहे; मात्र या चौकशीतून न्याय न मिळाल्याने तक्रारकर्ता विद्यार्थिनी पुन्हा न्यायालयात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रॅगिंग झालीच नाही?सूत्रांच्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी २०१९ रोजी तक्रारकर्ता विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान, विद्यार्थिनीवर रॅगिंग झाल्याची तक्रार पालक व पीडित विद्यार्थिनीने तत्कालीन अधिष्ठाता यांच्याकडे केली होती. त्यावेळी हे प्रकरण आपसात मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांतदेखील तक्रार करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली; परंतु अहवालानुसार रॅगिंग झालीच नाही, तर तक्रारकर्त्या विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न का केला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.रॅगिंग प्रकरणी गुरुवारी अन्टी रॅगिंग कमिटीची अंतिम व महत्त्वपूर्ण बैठक झाली. चौकशीदरम्यान, कामाच्या वादातून तक्रारकर्त्या विद्यार्थिनीला त्रास झाल्याचे आढळले; परंतु त्याला रॅगिंग म्हणता येणार नाही. त्यामुळे तिन्ही वरिष्ठ विद्यार्थिनींवर प्रत्येकी २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय, यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास होणार नाही, याबाबत सर्वांनाच समज देण्यात आला.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय