शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे पूर्ण; ३.८४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:20 IST

जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अंतिम अहवाल सोमवार, ११ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, सातही तालुक्यातील पीक नुकसानाच्या पंचनाम्यांचे अहवाल शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख ९८ हजार २९५ शेतकऱ्यांच्या ३ लाख ८४ हजार ४९४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अंतिम अहवाल सोमवार, ११ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत सतत बरसलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या सोयाबीन, ज्वारी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी सोयाबीन सडले असून, ज्वारीला कोंब फुटले. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. त्यामुळे अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांचे उत्पादन बुडाले. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने पळविल्याने शेतकरी संकटात सापडला.पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत ३० आॅक्टोबरपासून तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या संयुक्त पथकांद्वारे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले. ८ नोव्हेंबरपर्यंत पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, जिल्ह्यातील सातही तालुक्यातील पीक नुकसानाच्या पंचनाम्यांचे अहवाल तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत ९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आले.त्यानुसार जिल्ह्यातील १ हजार ६ गावांमध्ये २ लाख ९८ हजार २९५ शेतकºयांचे ३ लाख ८४ हजार ४९४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अंतिम अहवाल ११ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, पीक नुकसानाचा अंतीम अहवाल सोमवार, ११ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.-संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी