शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ग्रंथालयांना आता दहा वर्षातून एकदाच पुरस्कार

By admin | Updated: August 31, 2015 01:37 IST

नवीन अटी व शर्तींंमध्ये किमान ५0 टक्के गुण प्राप्त करणारे ग्रंथालयेच ठरणार पात्र.

कारंजा (वाशिम) : ग्रंथालय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी शासनाकडून देण्यात येणार्‍या सार्वजनिक उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्काराच्या अटी व शर्तींमध्ये बदल करण्यात आले असून, आता या अटीनुसार ५0 टक्के गुण प्राप्त करणारे ग्रंथालय आणि ग्रंथालय कार्यकर्ते तथा सेवक या पुरस्कारासाठी पात्र ठरणार आहेत. याशिवाय हा पुरस्कार पटकावणार्‍यांना पुढील दहा वर्षे पुरस्कार देण्यात येणार नाही. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने गुरुवारीच यासंदर्भात निर्णय घेतला. ग्रंथालय चळवळीत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या ग्रंथालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सवरेत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, तर उत्कृष्ट कामगिरी करणारे कार्यकर्ते व ग्रंथालय सेवकांना डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार शासनाकडून देण्यात येतो. यासंदर्भातील पूर्वीचे शासन निर्णय अधिक्रमित करून पुरस्काराबाबत सुधारित अटी, निकष निवड प्रक्रिया आणि कार्यपद्धती निश्‍चित करण्यात आली आहे. पुरस्काराबाबतच्या अटी व गुणवत्तेच्या निकषांची पूर्तता करणार्‍या, तसेच किमान ५0 टक्के गुण प्राप्त करणारे ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक यांनाच पुरस्कारासाठी पात्र पाठविण्यात येणार आहे. एखाद्या वर्षी प्राथमिक अटी व निकषांची पूर्तता होत नसल्यास, तसेच ज्या पुरस्कारामध्ये कि मान ५0 टक्के गुण प्राप्त करणारे ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक नसेल त्यावर्षी तो पुरस्कार दिला जाणार नाही. याशिवाय ग्रंथालयास एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार मिळाल्यानंतर किंवा ग्रंथालय सेवक तथा कार्यकर्त्यास डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार मिळाल्यानंतर या पुरस्कारासाठी पुढील दहा वर्षे अर्ज करता येणार नाही. प्राथमिक अटीचा भंग झाल्यास पुरस्कार व त्याअनुषंगिक सोयी, सुविधा परत घेऊन संबंधितावर कारवाई करण्याचा निर्णयही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २७ ऑगस्ट रोजी घेतला.