शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत बुधवार ठरला आंदोलनाचा

By admin | Updated: December 11, 2014 00:51 IST

कर्मचा-यांचे काळ्य़ा फिती लावून आंदोलन; आठ महिन्यांच्या थकीत वेतनासाठी मनपात शिक्षकांची गांधीगिरी.

अकोला: महापालिका कर्मचार्‍यांचे नियमित वेतन आणि पाचव्या वेतन आयोगासह सहाव्या वेतन आयोगाची रक्कम थकीत आहे. हे वेतन देण्यात यावे या मागणीसाठी कर्मचारी संघर्ष समितीने ८ डिसेंबरपासून आंदोलन छेडले असून, बुधवारी कर्मचार्‍यांनी काळ्य़ा फिती लावून कामकाज केले.महापालिकेच्या सेवानवृत्त तसेच कार्यरत कर्मचार्‍यांचे पाच महिन्याचे वेतन थकीत आहे. कालबद्ध पदोन्नतीची वेतन श्रेणी लागू करून फरकाची रक्कम अदा करणे, जुलैपासून वेतनवाढ लागू करणे, रजा रोखीकरण, उपदानाची रक्कम सेवानवृत्त कर्मचार्‍यांना मुदतीच्या आत वाटप करण्यासोबतच पगारातून कपात केलेली रक्कम कर्मचार्‍यांच्या खात्यामध्ये त्वरित जमा करण्याच्या मागणीसाठी मनपा कर्मचारी संघर्ष समितीने ८ डिसेंबरपासून आंदोलन छेडले. टप्प्याटप्प्याने छेडल्या जाणार्‍या आंदोलनादरम्यान ८ डिसेंबर रोजी मनपासमोर ताटवाटी बजाओ आंदोलन करण्यात आले होते. दुसर्‍या टप्प्यात १0 डिसेंबर रोजी मनपा कर्मचार्‍यांनी काळ्य़ा फिती लावून आंदोलन छेडले असून, सदर आंदोलन १२ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. त्यानंतरही प्रशासनाने कर्मचार्‍यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास २३ डिसेंबरपासून मनपा कार्यालयावर मोर्चा व बेमुदत कामबंद आंदोलन छेडणार असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष पी.बी. भातकुले यांनी स्पष्ट केले. त्याच प्रमाणे महापालिका प्रशासनाने आठ महिन्यांपासून वेतन अदा न केल्याने संतप्त झालेल्या शिक्षक संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. बुधवारी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात शिक्षकांनी गांधीगिरी करीत मनपा अधिकार्‍यांना गुलाबाचे फूल देऊन भावना व्यक्त केल्या.