शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

पंतप्रधान आवास योजना अकोल्यात वांध्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 2:15 AM

खासगी जमिनीला ‘टीडीआर’  (हस्तां तरणीय विकास हक्क) लागू करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने संचालक  नगररचना विभाग (पुणे) कार्यालयाकडे सादर केला होता.  या विभागाने हा  प्रस्ताव गुंडाळल्याचे वृत्त आहे. शहरात  मात्र घरे उभारण्यासाठी प्रशासनाकडे  जागाच उपलब्ध नसल्यामुळे योजनेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले  आहे. 

ठळक मुद्देखासगी जमिनीला ‘टीडीआर’ देण्याचा प्रस्ताव गुंडाळलाघरे उभारण्यासाठी जागाच नाही!

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील आरक्षित जमिनींचे र्मयादित क्षेत्रफळ तसेच पंतप्रधान  आवास योजनेची व्याप्ती पाहता, खासगी जमिनीवर ही योजना राबविणेयाचे  महापालिकेचे प्रयत्न आहेत. त्यासाठी खासगी जमिनीला ‘टीडीआर’  (हस्तां तरणीय विकास हक्क) लागू करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने संचालक  नगररचना विभाग (पुणे) कार्यालयाकडे सादर केला होता.  या विभागाने हा  प्रस्ताव गुंडाळल्याचे वृत्त आहे. शहरात  मात्र घरे उभारण्यासाठी प्रशासनाकडे  जागाच उपलब्ध नसल्यामुळे योजनेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले  आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे,  या उद्देशातून ६0 हजारांपेक्षा अधिक लाभार्थींनी मनपा प्रशासनाकडे अर्ज सादर  केले आहेत. प्रकल्पासाठी नियुक्त केलेल्या ‘शून्य कन्सलटन्सी’ने पहिल्या ट प्प्यात झोपडपट्टी भागाचा प्रकल्प अहवाल सादर केला असता शासनाकडून  ५२ कोटी रुपये मंजूर झाले. मनपा क्षेत्रात सुमारे २00 झोपडपट्टय़ा आहेत.  हद्दवाढीमुळे मनपा क्षेत्राचा भौगोलिक विस्तार झाला असला, तरी या भागात  शासकीय जागांचा अभाव आहे. पंतप्रधान आवास योजनेचे निकष व लाभा र्थींची संख्या पाहता घरे व इमारती उभारण्यासाठी मनपा क्षेत्रातील आरक्षित  जागांचे क्षेत्रफळ अपुरे पडणार असल्याचे चित्र आहे. सर्वसामान्यांना योजनेचा  लाभ देण्याच्या उद्देशातून घरे, इमारती उभारण्यासाठी महापालिकेकडे खासगी  जमीन घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे; परंतु मनपाची आर्थिक परिस्थिती व सदर  जमिनींच्या किमती पाहता अशा जागा विकत घेणे प्रशासनाला शक्य नाही.  अशा स्थितीत ‘पीएम’ आवास योजनेतील घरे आणि घनकचरा व्यवस्था पनासाठी खासगी जमिनींना रोख रकमेच्या बदल्यात ‘टीडीआर’ (हस्तांतरणीय  विकास हक्क) देण्याची गरज असल्याचा मुद्दा महापौर विजय अग्रवाल यांनी  शासनाकडे उपस्थित केला होता. योजनेसाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे  संपादनसुद्धा ‘टीडीआर’ देऊन करता येईल. त्यानुषंगाने ‘पीएम’आवास योजना  राबविण्यासाठी निकषांमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी करीत मनपा प्रशासनाने  संचालक नगररचना विभाग पुणे कार्यालयाकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला.  नगररचना विभागाने कोणताही निर्णय न घेता हा प्रस्ताव बासनात गुंडाळून  ठेवल्याची माहिती समोर आली आहे. 

जागाच नसेल तर घर कोठे बांधणार? ‘पीएम’आवास योजनेचे निकष व विविध टप्पे पाहता लाभार्थींना घरे बांधून  देण्यासाठी प्रशासनाकडे जागाच उपलब्ध नसेल, तर घरांचे बांधकाम कोठे  करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘शून्य कन्सलन्टसी’कडे ६१ हजार  लाभार्थींचे अर्ज प्राप्त झाले आहेत.  कन्सलन्टसीने कागदोपत्री ‘डीपीआर’  तयार करून त्याबदल्यात देयक मागितल्यास सदर देयक सत्ताधारी पक्ष अदा  करण्याची संमती देईल का, याकडे सुज्ञ   अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

आरक्षणासाठी पुढाकार का नाही?खासगी जमिनींना ‘टीडीआर’ देण्यासंदर्भातील प्रस्ताव नगररचना विभागाने  बाजूला सारला असला, तरी खासगी जमिनींवर आरक्षण निश्‍चित करण्याचे  अधिकार मनपा प्रशासनाला आहेत. गोरगरीब लाभार्थींना झुलवत न ठेवता  योजनेचा लाभ खरच द्यायचा असेल, तर सत्ताधार्‍यांसह सर्वपक्षीय  नगरसेवकांनी पुढाकार घेऊन आरक्षण निश्‍चित करण्याची गरज निर्माण झाली  आहे.

..तर मग ‘डीपीआर’कशाचा?घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, याकरिता शून्य कन्सलटन्सीकडे ६१ हजार अर्जांची  नोंद आहे. स्वत:च्या जागेवर घरे उभारण्यांची संख्या कमी असली, तरी उर्वरित  लाभार्थींसाठी खासगी जमिनीवरच घरे उभारावी लागतील. प्रशासनाकडे जागाच  नसेल, तर कन्सलटन्सी कशाचा ‘डीपीआर’तयार करेल, याकडे सुज्ञ अक  ोलेकरांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारbankबँक