कृषी विद्यापीठात खरीपपूर्व मेळावा

By Admin | Updated: May 10, 2014 22:05 IST2014-05-10T19:41:36+5:302014-05-10T22:05:19+5:30

खरीप हंगामाचे नियोजन ठरणार!

Pre-harvest rally in Agriculture University | कृषी विद्यापीठात खरीपपूर्व मेळावा

कृषी विद्यापीठात खरीपपूर्व मेळावा

अकोला : येत्या खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी येत्या २० मे रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दुपारी १२.३० वाजता खरीपपूर्व कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कमी खर्चाची शाश्वत शेती यावर भर दिला जाणार आहे. तसेच या खरीप हंगामातील संभाव्य पाऊस व या पावसाला अनुकूल खरीप पिकांच्या जाती, नवीन संशोधित पीक ,आंतरपीक पद्धती, मृद व जलसंधारण व्यवस्थापन, एकीकृत कीड व रोग व्यवस्थापन, सुधारित अवजारे अर्थात खरिपाचे योग्य नियोजन करू न पिकांचे उत्पादन व उत्पन्न कसे वाढवता येईल, यावर प्रामुख्याने तज्ज्ञ शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्याच्या निमित्ताने विद्यापीठाने निर्माण केलेली बी-बियाणे, जैविक खते, विद्यापीठ प्रकाशने, निविष्ठा शेतकर्‍यांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येतील. या मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी शेतकर्‍यांनी २० मे रोजी दुपारी १२. ते १२.३० पर्यंत कृषी महाविद्यालय, अकोला येथील डॉ. के.आर. ठाकरे सभागृहाच्या प्रवेशद्वारावर करण्यात येईल. या मेळाव्यात जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विद्यापीठाच्यावतीने जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले आहे.

Web Title: Pre-harvest rally in Agriculture University