शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पोपटखेड सिंचन प्रकल्प रखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 20:22 IST

अकोट : तापी खोऱ्यातील पूर्णा उपखोऱ्यातून वाहणाऱ्या पोपटखेड गावाजवळ पठार नदीवर पोपटखेड (टप्पा-२)च्या प्रकल्पाचे काम नऊ वर्षांपासून सुरूच आहे.

लघू पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष अकोट : तापी खोऱ्यातील पूर्णा उपखोऱ्यातून वाहणाऱ्या पोपटखेड गावाजवळ पठार नदीवर पोपटखेड (टप्पा-२)च्या प्रकल्पाचे काम नऊ वर्षांपासून सुरूच आहे. निर्धारीत जागेवरून काळी माती न आणता इतर क्षेत्रात शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे, प्रकल्पाचे काम रखडण्याचे ते कारण आहे. पोपटखेड धरणाकरिता आवश्यक असलेली काळी माती पणजजवळील शहापूर (बृहत) प्रकल्पावरून घेऊन जाण्याबाबत लघू पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी पोपटखेड प्रकल्पाच्या कंत्राटदाराला पत्र देऊन कळविले होते. तरीसुद्धा शासनाचे मालकीचे महागाव येथील कापसी शिवारातील ई-क्लास जमिनीमधील काळ्या मातीवर डल्ला मारण्यात आला असल्याचे उघड झाले आहे. अकोट महसूल विभागाची उत्खनन व वाहतुकीची परवानगी न घेता अनेक दिवसांपासून माती चोरीत वेळ गेल्याने प्रकल्पाच्या कामाची गती मंदावली आहे. पोपटखेड लघू पाटबंधारे योजना (टप्पा-२)च्या प्रकल्पास ३०२५.४७ कोटी रुपये मूळ किमतीस ९ मे २००८ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाच्या कार्यारंभाचा आदेश एन.व्ही. भास्कर रेड्डी अँड कंपनीला १५ डिसेंबर २००८ ला देण्यात आला. सदर प्रकल्प सन २०१० मध्ये २ वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र नियोजित कालावधीत काम पूर्ण न करता ३०२५.४७ कोटी मूळ किंमत असलेल्या या प्रकल्पाकरिता ७२२७.६७ लाख रुपयांचा सुधारित प्रस्ताव ७ एप्रिल २०१६ रोजी मंजूर झाला आहे. तरीसुद्धा प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे आता ३१ जुलै २०१७ पर्यंतचा मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. पर्यायाने प्रकल्पाची किंमतसुद्धा वाढीव राहणार आहे. या प्रकल्पामुळे कोणतेही गाव, रस्ता बाधित होत नसून, पुनर्वसनाची कामे नव्हती. केवळ महसूल बुडवित माती चोरी करीत कोट्यवधी रुपये कमविण्याच्या घोरात मूळ किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. या धरणाची लांबी २०५० मीटर माथा रुंदी ४.५० मीटर तर महत्तम उंची २६.८६ मीटर राहणार आहे. या प्रकल्पासाठी १०७ हेक्टर भूसंपादनापैकी ५८.४१ हेक्टर भूसंपादन झाले. या धरणात ८.३६८ द.ल.घ.मी. साठा होणार आहे. पाणलोट क्षेत्र ७५.८८ चौ. कि.मी. राहणार असून, सिंचनाखाली १००६ हेक्टर जमीन येणार आहे. पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षण नसून, परिसरातील आंबोडा, मोहाळा, खुदवंतपूर, अकोलखेड, वाई, अकोली (जहॉ.) आदी गाव लाभ क्षेत्रात आहेत.