शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्वोपचार’च्या प्रतीक्षागृहातील ‘पीओपी’ कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 20:18 IST

अकोला : सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या प्रतीक्षागृहाच्या छताचे प्लास्टर आॅफ पॅरीस (पीओपी) कोसळल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली.

तीन जखमी: शनिवारी मध्यरात्री घडली घटनाअकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या प्रतीक्षागृहाच्या छताचे प्लास्टर आॅफ पॅरीस (पीओपी)अचानकपणे कोसळल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या घटनेत एक पुरुष व दोन महिलांसह तीन जण जखमी झाले.सर्वोपचारमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या निधीतून येथे प्रतीक्षागृह उभारण्यात आले आहे. रुग्णांचे नातेवाईक या प्रतीक्षागृहाचा वापर करतात. येथे रात्री झोपणाऱ्यांचीही संख्या मोठी असते. शनिवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास या प्रतीक्षागृहातील छताला असलेल्या ‘पीओपी’चा एक मोठा भाग अचानकपणे कोसळला. यावेळी प्रतीक्षागृहात रुग्णांचे नातेवाईक झोपलेले होते. रात्री अचानकपणे पीओपीचा भाग झोपलेल्या लोकांच्या अंगावार कोसळला. यावेळी प्रतीक्षागृहात १५ ते २० जण झोपलेले होते. त्यापैकी तीघांना गंभीर जखमा झाल्या. वर्धा जिल्ह्यातील रिता प्रमोदराव थोटे या महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागला असून, त्यांना १२ टाके पडले. या व्यतिरिक्त आणखी एक महिला व पुरुष या घटनेत गंभीर जखमी झाले. इतरांनाही किरकोळ मार लागल्याची माहिती आहे. जखमींवर उपचार करण्यात आले असून, त्यांना सुटी देण्यात आल्याचे ‘सर्वोपचार’ प्रशासनाकडून सांगण्यात आले. सदर प्रतीक्षागृहाच्या दुरुस्ती-देखभालीची जबाबदारी शिवसेनेकडे असल्यामुळे सर्वोपचार प्रशासनाने या घटनेबाबत शिवसेनेला कळविण्यात आल्याचे उप अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी सांगितले.