हृदयविकाराच्या झटक्याने पोलिसाचा मृत्यू

By Admin | Updated: June 15, 2015 01:53 IST2015-06-15T01:53:54+5:302015-06-15T01:53:54+5:30

न्यायालयातून परतत असताना आला झटका.

Policeman death due to heart attack | हृदयविकाराच्या झटक्याने पोलिसाचा मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्याने पोलिसाचा मृत्यू

अकोला - खदान पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका ४६ वर्षीय पोलीस कर्मचार्‍याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. न्यायालयातील कामकाज आटोपून परत येत असताना त्यांना अस्वस्थ सुटली, त्यानंतर आकोट स्टॅन्डनजीक त्यांना झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. रजपूतपुरा येथील रहिवासी तसेच खदान पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रवींद्र गणेशसिंह ठाकूर कामकाजासाठी न्यायालयात गेले होते. ते रामदासपेठ पोलीस ठाण्यासमोरून जात असताना त्यांना घबराहट सुटली. त्यामुळे तत्काळ सवरेपचार रुग्णालयात जाण्यासाठी ते निघाले, मात्र आकोट स्टॅन्डनजीक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ठाकूर यांचा जागेवरच मृत्यू झाला. या परिसरातील नागरिकांनी रवींद्र ठाकूर यांना तातडीने सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ठाकूर यांनी मरणोत्तर नेत्रदान केले. त्यांच्या नेत्रदानामुळे दोन दृष्टीबाधीतांच्या जीवनात प्रकाश निर्माण होईल.

Web Title: Policeman death due to heart attack