शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस फेल, नागरिकांनीच घेतली कमान

By admin | Updated: May 19, 2015 01:23 IST

सोनसाखळी चोरास पकडले; एक फरार.

अकोला - अशोक वाटिका चौकातील पेट्रोल पंपाच्या आवारात उभ्या असलेल्या महिलेच्या गळयातील सोनसाखळी हिसकून फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या अट्टल चोरट्यास नागरिकांनी सोमवारी रात्री पकडले. या चोरट्याला खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मलकापूर परिसरातील आकृतीनगर येथील रहिवासी विजय पोरे हे अशोक वाटिका चौकातील पेट्रोल पंपवरून दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. पेट्रोल पंपवर गर्दी असल्याने त्यांच्या पत्नी उषा पोरे या पेट्रोल पंपाच्या आवारात उभ्या होत्या. यावेळी त्यांच्या बाजूलाच उभा असलेला शेख मोहसीन शेख महबूब (रा. सोनटक्के प्लॉट) याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकून दुचाकीने पळ काढला. अशोक वाटिका चौकातील सिग्नल तोडून हा चोरटा फरार झाला; मात्र गोपाल ठाकूर व त्यांच्या काही मित्रांनी या चोरट्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पेट्रोल पंपवर आणून त्याला खदान पोलिसांच्या ताब्यात दिले. खदान पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, रात्री उशिरा या अट्टल चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती खदानचे ठाणेदार छगन इंगळे यांनी दिली. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकून फरार होणार्‍या चोरट्यांचे प्रमाण वाढले आहे. मॉर्निग वॉकला जाणार्‍या महिला किंवा घरासमोर उभ्या असलेल्या महिलांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकणे व दुचाकीने पळ काढण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. एकाही चोरट्याविरुद्ध फास आवळण्यास पोलिसांना अद्याप यश आले नाही. शेख मोहसीन शेख महबूब या अट्टल चोरट्यास नागरिकांनी पकडून त्याला खदान पोलिसांच्या ताब्यात दिले. या चोरट्याला सोडविण्यासाठी काही राजकीय पदाधिकार्‍यांनी खदान पोलीस ठाणे गाठून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.